Top Share Update: कमी किमतींच्या ‘या’ शेअर्सने एकाच महिन्यात केले पैसे दुप्पट! तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही देखील करू शकतात गुंतवणूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Top Share Update:- बरेच जण शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये जर आपण पाहिलं तर शेअर मार्केटमध्ये कायम चढउतार होत असते व त्या दृष्टिकोनातून गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. कधी कधी काही शेअर्स  खूप कमी किमतीचे असतात.

परंतु त्या दृष्टिकोनातून त्यांनी दिलेला परतावा मात्र चांगला असतो. जर आपण मागच्या महिन्यातील शेअर बाजाराचा विचार केला तर यामध्ये चार टक्क्यांची वाढ दिसून आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या कालावधीत म्हणजेच एका महिन्यात काही शेअर्स असे राहिले की त्यांनी शंभर टक्क्यांहून अधिक परतावा गुंतवणूकदारांना दिलेला आहे.

म्हणजेच गुंतवणूकदारांचे पैसे एकाच महिन्यात दुप्पट करण्याचे महत्त्वपूर्ण काम या शेअर्सने केलेले आहे. विशेष म्हणजे हे  शेअरची किंमत खूप कमी होती. म्हणजेच हे पेनी स्टॉक होते असे देखील म्हणता येईल. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या आर्थिक सल्लागाराचा किंवा गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतात.

 हे आहेत पाच टॉप शेअर्स

1- कॅट व्हिजन लिमिटेड जर महिन्याभरापूर्वीचा विचार केला तर हा शेअर 14.99 च्या पातळीवर होता व त्याची आता किंमत 37.72 इतकी आहे. म्हणजेच या शेअर्सने एका महिन्यात 151.63 टक्क्यांचा परतावा दिला आहे. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे मूल्य आता 251.63 लाख रुपये झाले असते.

2-Enbee Trade & Finance Ltd- हा शेअर्स महिनाभरापूर्वी 10.38 रुपयांच्या पातळीवर होता.या शेअरची किंमत 26.10 इतकी आहे. अशाप्रकारे या शेअर्सने एकाच महिन्यात 151.45% परतावा दिला आहे. समजा एखाद्याने जर एक लाख रुपये एक महिन्याभरापूर्वी या शेअर्समध्ये गुंतवले असते तर त्याचे मूल्य आता 251.45 लाख रुपये झाले असते.

3- स्मार्ट फिनसेक महिनाभरापूर्वी या शेअरची किंमत 9.18 होती. आता या शेअरची किंमत 22.39 रुपये इतकी आहे. म्हणजेच एका महिन्यात या शेअर्सने 143.90 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

4- सी टीव्ही नेटवर्क लिमिटेड साधारण महिन्याभरापूर्वी या शेअरची किंमत 3.60 होती. आता या शेअरचा दर 8.35 इतका आहे. म्हणजेच एकाच महिन्यात या शेअर्सने 131.94% चा परतावा दिला आहे.