Best Morning Tea : बरेच जण सकाळची सुरुवात चहा किंवा ग्रीन टीने करतात, पण चहापेक्षा ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे. वजन कमी करण्यापासून ते रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी ग्रीन टी सर्वात फायदेशीर मानली जाते. जर तुम्ही फिट आणि तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करत असाल तर ग्रीन टीचे सेवन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
तज्ज्ञांच्या मते, ग्रीन टीचे सेवन केल्याने त्वचेची गुणवत्ता, चयापचय क्रिया वाढते आणि व्यक्ती दीर्घकाळ सक्रिय राहते. ग्रीन टीचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटेही आहेत. तंदुरुस्त राहण्यासाठी लोक सकाळच्या व्यायामानंतर रिकाम्या पोटी ग्रीन टीचे सेवन करतात, जे खूप हानिकारक मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे योग्य आहे की अयोग्य चला जाणून घेऊया.

रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्याने पोटदुखी होऊ शकते. ग्रीन टीमध्ये टॅनिन म्हणून ओळखले जाणारे पॉलीफेनॉल असते जे पोटात ऍसिडचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे पोटदुखी, जळजळ किंवा बद्धकोष्ठता यासारख्या समस्या देखील होऊ शकतात. ग्रीन टी हे नेहमी जेवणानंतर किंवा दरम्यान सेवन करावे. तसेच ग्रीन टीमध्ये कॅफिन आढळते. जे गॅस्ट्रिक ज्यूस पातळ करून पोटाला हानी पोहोचवू शकते. त्याचा जास्त वापर केल्याने चक्कर येणे, उलट्या होणे यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.
ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत ?
न्याहारीच्या एक तास आधी ग्रीन टी पिऊ शकतो. सकाळी आणि संध्याकाळी ग्रीन टी प्यायल्याने चयापचय गतिमान होते आणि वजन कमी करण्यात मदत होते. ग्रीन टी एका दिवसात 3 ते 4 कपपेक्षा जास्त पिऊ नये. काही लोक ग्रीन टीमध्ये दूध आणि साखर मिसळून पितात. ग्रीन टीमध्ये साखर आणि दूध मिसळणे टाळा. तेसच जेवल्यानंतर लगेच ग्रीन टी पिणे धोकादायक ठरू शकते.
ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ?
दिवसातून 3 ते 4 कप ग्रीन टी प्यायला हवा. ग्रीन टीचे जास्त सेवन केल्याने यकृताचा त्रास होऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टीचे सेवन करू नका, यामुळे झोप येण्यास त्रास होऊ शकतो.
ग्रीन टी पिण्याचे फायदे :-
-ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे चयापचय वाढते. चयापचय वाढल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
-दररोज 1 ते 2 कप ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. हृदयाशी संबंधित आजारांमध्येही याचा फायदा होतो.
-ग्रीन टीमुळे स्मरणशक्ती वाढवण्यासही मदत होते. तसेच तणाव दूर करण्यासाठीही ग्रीन टी फायदेशीर आहे.