Vi Recharge Plans : सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन! अनलिमिटेड डेटासह किंमत 17 रुपयांपासून सुरु…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vi Recharge Plans : भारतात रिलायन्स जिओ, Vodafone Idea आणि एअरटेल या आघाडीच्या खासगी टेलिकॉम कंपन्या आहेत. या तिन्ही कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या जास्त आहे. कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. यात पोस्टपेड आणि प्रीपेड प्लॅन्सचा समावेश आहे.

परंतु या कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत वाढ केली आहे. अशातच जर तुम्ही स्वस्तात रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण Vodafone Idea ने सर्वात स्वस्त प्लॅन आणला आहे. ज्याची किंमत 17 रुपयांपासून सुरु आहे. हे लक्षात घ्या की कंपनीचा हा डेटा प्लॅन आहे.

Vodafone Idea चा 17 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Vodafone Idea मध्ये 50 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे अनेक प्रीपेड डेटा व्हाउचर मिळतात. या लिस्टमधील सर्वात परवडणाऱ्या प्लॅनची किंमत 17 रुपये आहे. कंपनीचा हा डेटा प्लॅन व्हाउचर फ्री नाईट डेटा आणि एका दिवसाच्या वैधतेसह येते. या प्लॅनमध्ये ग्राहकांसाठी रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कंपनीचा 19 रुपये आणि 24 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

19 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त 24 तासांसाठी 1 जीबी डेटा मिळत आहे. यानंतर, तुम्हाला 24 रुपयांचा रिचार्ज प्लॅन घेता येईल. परंतु हे लक्षात घ्या की या प्लॅनची वैधता फक्त एक तासाची आहे. तसेच, कंपनीच्या वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा मिळतो. याचाच अर्थ या एका तासात तुम्ही किती हाय-स्पीड डेटा वापरू शकता यावर कोणतीही मर्यादा नसेल.

Vodafone Idea चा 25 रुपयांचा प्लॅन

समजा तुम्हाला जाहिरातमुक्त संगीत ऐकायला आवडत असेल तर आता तुम्ही 25 रुपये डेटा व्हाउचरची निवड करू शकता. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 दिवसासाठी 1.1GB डेटा मिळेल. तसेच, Vi अॅपमध्ये हंगामा म्युझिकसह 7 दिवसांसाठी जाहिरातमुक्त संगीताचा अतिरिक्त लाभ तुम्हाला घेता येईल.

Vodafone Idea चे रु 29 आणि 39 रुपयांचे प्लॅन

यानंतर तुम्ही 29 रुपयांचा प्लॅन निवडू शकता. हे लक्षात घ्या की हा प्लॅन एक साधा डेटा व्हाउचर आहे जो 2 दिवसांसाठी 2GB डेटासह येतो. यात तुम्हाला जास्त डेटा पाहिजे असेल तर तुम्ही 39 रुपयांचा प्लॅन घेऊ शकता. ते 3GB डेटा आणि 7 दिवसांच्या वैधतेसह येते.

Vodafone Idea चा 49 रुपयांचा प्लॅन

लिस्टमधील सर्वात शेवटचा क्रमांक 49 रुपयांचा प्लॅन आहे. वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये 6GB डेटा मिळत आहे परंतु या प्लॅनची ​​वैधता फक्त 24 तास किंवा 1 दिवसाची आहे.