अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- सध्या देश विदेशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. संसर्ग कमी करण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणावर करणे अत्यंत गरजेचे आहे असे WHO प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. दिवसभरातील कोरोनाचा थोडक्यात आढावा.
१) आज मुंबई महानगर क्षेत्रात 5631 नवे रुग्ण आढळले आहेत.

२ ) दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली होती. तिथे नाईट कर्फ्यू काढून टाकला आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये नवीन संक्रमणाचा उच्चांक गाठला आहे.
३) कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेत महाराष्ट्रात जानेवारीत 2 लाख केसेस येऊ शकतील’, असं राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी म्हटले आहे.
४ ) कोविड लसीकरणाच्या चौथ्या डोसला मान्यता देणारा इस्रायल हा जगातील पहिला देश ठरला आहे.
५) मुंबईत सार्वजनिक ठिकाणी संध्याकाळी पाच ते पहाटे पाचपर्यंत जमावबंदी करण्यात आली आहे
६) राज्यातील १० मंत्र्यांना आणि २० आमदारांना कोरोची लागण – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













