अमृता फडणवीसांचे ट्विट…‘मी तुला निवडले आता आणि कायमचे… माझ्या हृदयात

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- दरम्यान त्यांनी सादर केलेली गाण्यांची कधी प्रशंसा होते, तर कधी त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. मात्र, ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत आपली आवड जपत आहे.

नुकतेच व्हलेंटाईन दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी आपल्या नव्या गाण्याची घोषणा केलीय. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो.

या दिनाचं औचित्य साधून त्यांनी ट्विटरद्वारे आपल्या नव्या गाण्याची घोषणा केलीय. या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांचा नवा लूक पाहायला मिळतोय.

या लूकवरुन हाती त्रिशूळ, अंगावर भगवी वस्त्र आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा अशा रुपात त्या पाहायला मिळणार आहेत. लॉर्ड शिवा अर्थात महादेवाच्या भक्तीवर आधारित त्यांचं नवं गाणं असणार आहे.

ट्वीटमध्ये म्हंटले… ‘मी तुला निवडले आता आणि कायमचे… माझ्या हृदयात, मनात, आत्म्यात, विश्वासात आणि श्वासात तू आहेस…

हा व्हॅलेंटाईन डे जो आपल्या प्रिय व्यक्तीची प्रशंसा करतो… मी माझ्या रुद्र… लॉर्डशिवाला माझी संगीतमय स्तुती अर्पण करते, असं अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.