Maharashtra News:दसऱ्याला रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा आहे. सार्वजनिक मंडळांसोबतच राजकीय पक्षांकडून यासाठी मोठे कार्यक्रम घेतले जाता.
अलीकडे तर कोणी किती उंच रावणाचे दहन केले, यावरूनही स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आदिवासी बचाव अभियान आणि आदिवासी संघटनांनी रावण दहनास विरोध केला आहे.

एवढेच नव्हे तर तर कुणी रावण दहन केल्यास त्याच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे. या आदिवासी संघटनांच्या मते, रावण हा विविध गुणांचा समुच्चय आहे.
तो संगीतज्ञ, राजनीति तज्ञ, उत्कृष्ट शिल्पकार, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी होता. अशे असताना त्याच्या प्रतिमेचे दहन करून त्याला व त्याच्या गुणांना अपमानित करणे चुकीचे आहे.
अशा प्रकारे केल्या जणाऱ्या रावण दहन कार्यक्रमातून दलित, आदिवासी, अनुसूचित जाती जमाती समाजाचा अपमान होत आहे. त्यामुळे हा विरोध करण्यात येत आहे. रावण दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी महाराष्ट्राच्या आदिवासी बचाव अभियान आणि सर्व आदिवासी संघटनांनी केली आहे.