कोल्हापूर : गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांच्या अडचणीत दिवसोंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. कारण मराठा समाजाबद्दल (Maratha community) केलेल्या विधानानंतर त्यांची रवानगी आता कोल्हापुर पोलिसांकडे (Kolhapur Police) होण्याची शक्यता आहे.
सध्या सातारा पोलिसांच्या (Satara Police) ताब्यात असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा मिळत असतानाच आता मात्र साताऱ्यानंतर त्यांची रवानगी कोल्हापुरात होते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

साताऱ्यात सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल झाला होता. मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) आंदोलनदरम्यान आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
साताऱ्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर राज्यात वेगवेगळ्या भागात सदावर्तेविरोधात गुन्हा दाखल झाला. कोल्हापुरातही सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मराठा आरक्षणादरम्यान केलेल्या वक्तव्याविरोधातच हा गुन्हा कोल्हापुरातही एका व्यक्तीने दाखल केला आहे. त्यानंतर आता कोल्हापूर पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा मिळावा, अशी मागणी केली होती.
दरम्यान, १८ एप्रिलला सातारा न्यायालायने (Satara Court) गुणरत्न सदावर्ते यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना अर्थर रोड कारागृहात आणण्यात आले.
त्यामुळे एकीकडे गिरगाव पोलिसांनी सदावर्तेंनी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे सातारा सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्तेंचा ताबा मुंबई, सातारा यानंतर कोल्हापूर पोलिसांकडे जाईल,असे सांगितले जात आहे.