पुण्यात इमारतीची बेसमेंटची जाळी कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- येरवडा येथील शास्त्रीनगर येथील गल्ली क्रमांक ८ येथील एका इमारतीचा लोखंडी सांगडा बांधण्याचे काम सुरु असताना तो अचानक कोसळला असून त्यात किमान ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

तर स्लॅबची जाळी कोसळून दहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी माहिती दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सुरू होते. त्या दरम्यान बेसमेंटची जाळी कोसळून, त्यामध्ये 10 जण गंभीर जखमी झाले.

त्यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य पाच जणांवर उपचार सुरू आहेत. अग्निशामक दलाला या घटनेची माहिती रात्री ११ वाजून १४ मिनिटांनी मिळाली.

त्याबरोबर अग्निशामक दलाच्या ५ गाड्या, रुग्णवाहिका, १०८ च्या १० रुग्णवाहिका, पोलीस घटनास्थळी पोहचले. हा लोखंडी सांगाडा इतका मोठा होता

की त्याखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी इलेक्ट्रीक करवतीचा वापर करुन हा सांगाडा कापला व त्यानंतर खाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, येथून १० कामगारांना बाहेर काढून ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

ही कामगार कुठले आहेत आणि नेमके किती कामगार कामावर होते.याबाबत अधिक तपास सुरू आहे.तर अग्निशमन दलाच्या सहाय्याने मदत कार्य पार पडले असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe