अरे देवा काय झालं…पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या ट्रक्टरला ट्रकची धडक

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Maharashtra News :-पंढरपूरमधून एक मोठी बातमी समोर येतेय. वारकऱ्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळतेय. या अपघातात पाच वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर 30 ते 40 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.

सोलापूर – पुणे महामार्गावर कोंडी गावाजवळ ही घटना घडली आहे. या अपघातातील मृत व जखमी असे सर्वजण वारकरी सांप्रदायातील असून तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील राहणारे आहेत.

एकादशीनिमित्त हे सर्वजण पांडुरंगाच्या दर्शनासाठी रात्री ट्रक्टर ट्रालीत बसून पंढरपूरला निघाले होते. याबाबत अधिक माहिती अशी, सोलापूर-पुणे महामार्गावर शहराला खेटून असलेल्या कोंडी गावच्या शिवारात रस्त्याच्या कडेला असलेल्या

पहिल्या मार्गिकेवर ट्रक्टर ट्रालीला पाठीमागून एका मालमोटारीची (एमएच १२ टीव्ही ७३४८) जोरात धडक बसली. भरधाव वेगातील मालमोटारीच्या पुढील डाव्या बाजूच्या चाकाचे टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि मालमोटार भाविकांच्या ट्रक्टर ट्रालीवर जोरात आदळला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

जखमींपैकी सहाजणांची प्रकृती गंभीर असून त्यांना शासकीय रूग्णालयात अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शासकीय रूग्णालयाकडे धाव घेतली.

घटनास्थळीही जाऊन त्यांनी अपघाताचे निरीक्षक नोंदविले. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक अरूण फुगे हे पुढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe