पुणे : गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) यांनी पुणे ग्रामीण पोलीस (Police) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी महिलांच्या सुरक्षेवरून बोलताना त्यांनी पुण्यामध्ये (Pune) महिलेबाबत घडलेली एक घटना सांगितली आहे.
यावेळी बोलताना त्यांनी एका पीएसआयवर (PSI) हल्लाबोल चढवला आहे. या पोलिसाने एका महिलेला जाळ्यामध्ये ओढून तेच कसा वापर केला व नंतर त्या महिलेने त्याच्या नवऱ्याला सोडून पीएसआय सोबत राहू लागली यावर पडळकर बोलले आहेत.
पडळकर म्हणाले, त्या बिचाऱ्या नवऱ्याला काहीच माहीत नाही. बायकोने आग्रह केला मला एमपीएससी करायची आहे. मला पुण्याला जायचे आहे. मला क्लास (Class) लावायचे आहेत.
हीने आग्रह केल्यानंतर त्याला दोन मुली असताना म्हणाला तुला जायला परवानगी देतो. आपण पुण्याला जाऊ, महिला होस्टेल कुठे आहे बघू, तिथे तुझी सोय करू, तीने सांगितलं आता माझी सोय करायची गरज नाही.
तिथे पीएसआय मोहीते आहेत. जे आता माझ्या ओळखीचे झाले आहेत. खूप चांगले आहेत. तिथे त्यांच्या पाहुण्याचे घर आहे. तिथे त्यांनी व्यवस्था केली आहे. काही दिवसांनंतर बायको नवऱ्याला फोन करायची बंद झाली.
मग नवऱ्याच्या हा प्रकार लक्षात आला तेव्हा तो तिला भेटायला गेला. तेव्हा त्या पीएसआयच्या नवाचा टॅटू तिच्या शरिरावर गोदून घेतला होता, असा धक्कादायक प्रकार घडल्याचे पडळकरांनी सांगितले.