Maharashtra Weather Update:भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) नुकत्याच काही दिवसांपूर्वी मान्सून (Mansoon Update) संदर्भात अंदाज वर्तवला होता.
भारतीय हवामान विभाग अनुसार, यावर्षी मान्सून हा लवकरच हजेरी लावणार आहे. मान्सून 1 जून पर्यंत महाराष्ट्राच्या कोकणात (Konkan) प्रवेश करणार असल्याचा अंदाज विभागाने वर्तवला होता मात्र आता नव्याने जाहीर केलेल्या अंदाजानुसार मान्सून हा नेहमीच्या वेळेत म्हणजे 5 जूनपर्यंत दाखल होणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. सध्या मान्सून दक्षिणेकडे मोठ्या वेगाने आगेकूच करत आहे. आता मान्सून अरबी समुद्रात असून श्रीलंकेच्या किनारी भागापासून काही अंतरावर बघायला मिळतं आहे. मात्र या दरम्यान महाराष्ट्र राज्याला मान्सून पूर्व बेमोसमी पावसाने चांगलं झोडपलं आहे.
काल म्हणजेच शुक्रवारी 20 मे रोजी मान्सून पूर्व पावसाने राज्यात हजेरी लावली. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व मान्सून पाऊस बघायला मिळाला. पावसाबरोबर वादळ देखील शुक्रवारी बघायला मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले.
राज्यातील फळ बागायतदारांचे यामुळे काही भागांत नुकसान झालं. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे हा वादळी पाऊस आल्याचे सांगितलं जातं आहे. सध्या यामुळे पूर्वेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. आणि याचा परिणाम आता महाराष्ट्रातही जाणवत आहे.
या बेमोसमी पावसामुळे बीडमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. विशेषता आष्टीमध्ये यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. या भागातील उन्हाळी कांद्याला यामुळे मोठा फटका बसला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, काढणीला आलेल्या कांद्याला यामुळे मोठा फटका बसला असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला आहे.
राज्यातील या जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची लागली हजेरी
यवतमाळ जिल्ह्यात काल सायंकाळी बेमोसमी पाऊस झाला. या ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले. मात्र उकड्याने हैराण जनतेस यामुळे आराम मिळाला. उस्मानाबाद मध्ये देखील काल पावसाने हजेरी लावली.
उस्मानाबाद मधील उमरगा, तुळजापूर, लोहरा या तालुक्यात मान्सून पूर्व पावसाचा जोर अधिक होता तर काही तालुक्यात हलका पाऊस बघायला मिळाला. याशिवाय पाश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर मराठवाड्यात परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात बेमोसमी पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्याचे नुकसान झाले. मात्र उकाड्याने त्रस्त जनतेस या पावसाने आल्हाददायक वातावरणाचा आनंद घ्यायला मिळाला.