अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Pune News :-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. गरवारे कॉलेज ते आनंद नगर मेट्रो जंक्शन मेट्रोसह विविध विकासकामांचं उदघाटन, भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
महापालिका निवडणूक पुढील महिन्यात असल्याने भाजप या निमित्ताने मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे. तर राष्ट्रवादीने मोदींच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिलाय.
या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोदींच्या दौऱ्यासाठी वाहतुकीत करण्यात आले बदल मोदी यांच्या रविवारी पुणे शहर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कर्वे रस्ता आणि पौड रस्त्याचा काही भाग सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
पोलीस उपायुक्त (वाहतूक) राहुल श्रीरामे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे