राज ठाकरे म्हणाले, उद्या ईद आहे म्हणून…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल औरंगाबादच्या सभेत भोंग्यासंबंधी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी कार्यकर्त्यांसाठी एक ट्विट केले आहे.

त्यामध्ये संयमाने घेण्याचा सल्ला दिला आहे. ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना उद्देशून म्हटले आहे, ‘उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच.

मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका.

आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन.

तूर्तास एवढंच!’ मनसेचे हे आंदोलन लक्षात घेऊन सरकार आणि पोलिस सज्ज झाले आहेत. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आपल्या सैनिकांना आवर घालण्याच्या दृष्टीने हे ट्विट केल्याचे दिसून येते. आता ४ मे रोजी पुढील भूमिका काय, असणार याकडे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News