जगातील सर्वात सुंदर पर्यटनस्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील सिंधुदुर्गचा समावेश

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून बहुमान मिळालेल्या सिंधुदुर्गाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सिंधुदुर्गाचा समावेश केला आहे.

यामध्ये लंडन, सिसिली, सिंगापूर यासह इस्तंबूल, इजिप्त, माल्टा, सर्बिया, केपवर्दे अशा आंतरराष्ट्रीय तसेच सिक्कीम, मेघालय, ओरिसा, राजस्थान, गोवा, कोलकाता, भिमताल,

केरळमधील आयमानम अशा भारतीय ९ पर्यटन स्थळांत महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्गचा समावेश केला आहे. जगातील सर्वात सुंदर 30 पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये सिंधुदुर्गचा समावेश असणे

ही खरोखरच आपल्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. यंदाच्यावर्षी भेट देण्यासाठी निवडण्यात आलेल्या 30 पर्यटन स्थळांमध्ये भारतातील 9 स्थळांचा समावेश आहे.

त्यापैकी महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा आहे. या यादीमध्ये समावेशामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचा जिल्हा असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News