अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- शहरातील कापडबाजारात गर्दीचा गैरफायदा घेत पर्समध्ये ठेवलेली 28 हजाराची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे. या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नमाला सुभाष गांगर्डे (वय 46 रा. कडा ता. आष्टी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी रत्नमाला गांगर्डे यांचे कडा (ता. आष्टी) येथे देवांश कलेक्शन नावाने दुकाने आहे.
दुकानाचे सामान खरेदी करण्यासाठी फिर्यादी गांगर्डे त्यांच्या पुतणीसोबत नगर शहरात आल्या होत्या. कापडबाजार येथे खरेदी झाल्यानंतर त्या परतत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समध्ये ठेवलेली छोटी पर्स चोरून नेली.
त्यामध्ये 28 हजार रूपयांची रोख रक्कम होती. फिर्यादी गांगर्डे यांनी हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बिल देताना चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कोतवाली पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम