सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जाहीर केली एवढी भरघोस पगारवाढ

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Maharashtra News :-होळीच्या सणापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने संरक्षण विभागातील नागरी कर्मचाऱ्यांच्या जोखीम भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात 1000 रुपयांपासून ते 8000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार कर्मचाऱ्यांना हा भत्ता दिला जातो आणि तेच भत्ते वाढवण्याचा निर्णय घेतात.

त्यानंतर सरकारच्या संमतीनंतर त्याची घोषणा केली जाते. संरक्षण खात्यातील अनेक श्रेणीतील नागरी कर्मचाऱ्यांनाही जोखीम खात्याचा लाभ दिला जातो. परंतु, हा भत्ताही पदानुसार बदलतो.

या विशेष भत्त्याची वार्षिक आधारावर गणना केली, तर त्यामुळे कर्मचार्‍यांच्या पगारात वार्षिक 1000 रुपयांवरून 8000 रुपयांपर्यतची वाढ झाली आहे.

या श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात अकुशल कर्मचाऱ्यांना दरमहा 90 रुपये जोखीम भत्ता दिला जाईल. याशिवाय अर्ध-कुशन कर्मचार्‍यांना 135 रुपये, कुशल कर्मचारी 180 रुपये,

अराजपत्रित अधिकारी 408 रुपये आणि राजपत्रित अधिकारी 675 रुपये दरमहा हा भत्ता दिला जाणार आहे. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना १.५ वर्षांची म्हणजेच १८ महिन्यांची भत्ता थकबाकी २ लाख रूपये एकवेळ सेटलमेंट म्हणून देऊ शकते.

मात्र सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र नवीन आर्थिक वर्ष म्हणजेच १ एप्रिलनंतर यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe