अजितदादांना भरकार्यक्रमात प्रश्न विचारणारा व्यक्ती, या नेत्याचा माजी पीए….. वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- आज शिवनेरीवर शिवजयंतीच्या कार्यक्रमात मराठा आर्कषणावरून काही तरुणांनी मराठा आरक्षणाचा विषय छेडून अजितदादांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला आहे.

‘दादा, 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या, असं हे तरुण म्हणाले. त्यामुळे अजितदादा काहीवेळ भडकले. त्यांनी भर सभेतच या तरुणांना कानपिचक्या दिल्या’ केंद्र सरकारने कायद्यात बदल केला आणि 50 टक्क्याहून अधिक आरक्षण देण्याची तरतूद केली, तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असं अजितदादा म्हणाले.

तेव्हा काही तरुणांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला. शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्याच्यावेळी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या तरुणांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक शब्दात खडसावले. शिवजयंतीच्या कार्यक्रमापूर्वी मी तुमच्याशी मराठा आरक्षणविषयी बोललो होतो. तुमचं म्हणणंही ऐकून घेतलं.

तरीही तुम्ही बोलत आहात. तुम्ही काय कुणाची सुपारी घेऊन आला का?, असा सवालच अजित पवार यांनी केला. अजित पवारांना योगेश केदार या तरुणानं मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला आहे. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळायला हवं ही आमची भूमिका आहे.

अजित दादांना आम्ही निवडून दिलंय त्यामुळे आम्ही प्रश्न विचारणार. मुख्यमंत्री जरी इथे आले असते तरी आम्ही जाब विचारला असता. जी उत्तर राजकीय नेते देतायेत ती सगळी थोतांड आहेत. अशी टीकाही योगेश केदार याने केली आहे. अजितदादांना प्रश्न विचारणारा व्यक्ती हा खासदार संभाजी छत्रपती यांचा पूर्वीचा पीए होता.

आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत. आम्हालाही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. त्यांचं आरक्षण रखडवून आम्हाला काय आनंद मिळतो का? काही कायद्याच्या गोष्टी आहेत. त्या समजून घेतल्या पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय दिला आहे.

आम्ही स्वत: पंतप्रधानांना भेटून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे. सरकारचे प्रयत्न अजूनही थांबलेले नाहीत. प्रयत्न सुरूच आहेत, असंही अजित पवारांनी सांगितलं. तसेच ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची मराठा तरुणांची मागणीही त्यांनी धुडकावून लावली.