पुण्यातील कुख्यात गँगस्टरची पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कुख्यात गँगस्टर गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे हिने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.यामुळे राजकारणात काही देखील होऊ शकते.

याचा प्रत्यय पुणेकरांना आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत जयश्री मारणे यांनी प्रवेश केला आहे.

जयश्री मारणे या पूर्वाश्रमीच्या मनसेच्या नगरसेविका होत्या. काही दिवसांपूर्वीच मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

यावेळी जयश्री मारणे म्हणाल्या, २०१२ ते २०१७ पर्यंत मनसेची नगरसेविका होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विचारांना प्रभावी होऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

कुख्यात गँगस्टर गजानन मारणे याच्याविषयी…

गजानन मारणेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. गुंड गजानन मारणेची 2 जणांच्या खून खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर त्याच्यावर आणखी खटले नसल्याने मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली.

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात 2014 मध्ये गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. तेव्हापासून मारणे हा तुरुंगात होता.