Bank Alert : देशातील मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या करोडो ग्राहकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे बँकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
PNB बँकेने आपल्या एका म्हटले आहे की, PNB सारख्या दिसणाऱ्या कोणत्याही बनावट लिंकवर क्लिक करू नका. बँकेची अधिकृत वेबसाइट www.pnbindia.in आहे. अशा परिस्थितीत कोणताही व्यवहार ऑनलाईन करताना नेहमी बँकेची अधिकृत वेबसाईट तापासा.
बँकेने आपल्या सोशल मीडिया हँडल X (पूर्वीचे ट्विटर) वर देखील याबद्दल पोस्ट केले आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘ग्राहकांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. पंजाब नॅशनल बँकेची (PNB) एकच अधिकृत वेबसाइट आहे. अशास्थितीत पंजाब नॅशनल बँक असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही खोट्यापासून वेबसाईटपासून सावध रहा आणि त्यावर क्लिक करू नका.’
पीएनबीच्या नावाने सुरू असलेली बनावट गुंतवणूक योजना
काही दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाच्या सायबर गुन्हे शाखेने पीएनबीच्या नावाने सुरू असलेल्या बनावट गुंतवणूक योजनेचा पर्दाफाश केला होता. ज्याची माहिती सरकारी सोशल मीडिया हँडल ‘सायबर दोस्त’वरही देण्यात आली आहे. या योजनेत पंजाब नॅशनल बँकेच्या नावाने गुंतवणूकदारांना आमिष दाखवून कमिशन दिल्याची चर्चा आहे.
पुढे ‘सायबर दोस्त’वरील पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, कोणत्याही बनावट अर्धवेळ नोकरी आणि गुंतवणूक ॲप्सच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये’
फसवणूक टाळण्यासाठी करा हा उपाय
कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी, काही गोष्टी लक्षात ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.
इंटरनेटवर गुंतवणुकीशी संबंधित कोणतीही जाहिरात पाहिल्यास त्याची पडताळणी करा. यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता.
कोणत्याही बँकेची वेबसाइट उघडताना नेहमी URL तपासा.
बँक तुमचा OTP कधीच विचारत नाही. या कारणास्तव, ऑनलाइन कोणाशीही OTP शेअर करू नका.
SBI बँकेचाही ग्राहकांना इशारा!
दुसरीकडे, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयने आपल्या पन्नास कोटींहून अधिक ग्राहकांना (एसबीआय अलर्ट) चेतावणी दिली आहे. बँकेने आपल्या खातेदारांना एका संदेशाबाबत अलर्ट पाठवला आहे. बँकेने सांगितले की, ग्राहकांना त्यांची बँक खाती बंद करण्याचे संदेश मिळत आहेत. हे बनावट संदेश आहेत, ज्यांच्या विरोधात बँकेने ग्राहकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना अशा कोणत्याही संदेशांना उत्तर देऊ नये असे सांगितले आहे. तसेच त्यांना तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती, OTP किंवा खात्याशी संबंधित माहिती कोणालाही देऊ नका. जर तुम्ही हे उत्तर दिले तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. हे मेसेज फसवणूक करणाऱ्यांकडून पाठवले जात आहेत. ज्याने अनेक लोकांची बँक खाती आधीच क्लिअर केली आहेत.