Home Loan Interest Rates : जर तुम्ही सध्या घर घेण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. काही बँका सध्या गृहकर्जावर उत्तम ऑफर देत आहेत, तसेच स्वस्त दारात कर्ज ऑफर करत आहेत. घर खरेदी करणे हा सर्वात प्रमुख आर्थिक निर्णयांपैकी एक आहे. खरेदीदाराचे सध्याचे उत्पन्न, त्याच्या भविष्यातील उत्पन्नाच्या अपेक्षा, आर्थिक उद्दिष्टे इत्यादींवर याचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो.
घर खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज पडते, अशा स्थितीत आपण गृहकर्जाची मदत घेतो. पण गृह कर्ज घेताना कधीही वेगवेगळ्या बँका किंवा वित्तीय संस्था यांच्या व्याजदरांची तुलना करणे अपेक्षित आहे. बहुतांश बँका सध्या नियमित व्याजदरापेक्षा किंचित कमी व्याजदराने गृहकर्ज देत आहेत. तर काही बँका जास्त व्याजदरात कर्ज देतात, आज आम्ही तुम्हाला देशातील अशा देशातील पाच मोठ्या बँकांच्या गृहकर्जावरील व्याजदरांबद्दल सांगणार आहोत, ज्या सध्या स्वस्त दारात कर्ज ऑफर करत आहेत.

कर्ज हे CIBIL स्कोअरवर अवलंबून असते, त्यानुसार बँका 8.6 टक्के आणि 9.65 टक्के दरम्यान व्याजदर आकारत आहे. 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्या कर्जदारांसाठी सर्वात कमी व्याज दर 8.6 टक्के आहे. जर स्कोअर 700 ते 749 दरम्यान असेल तर कर्ज 8.7 टक्के व्याजदराने उपलब्ध आहे. ६५० ते ६९९ गुणांसह कर्जदारांना ९.४५ टक्के दराने कर्ज दिले जात आहे. ५५० ते ६४९ च्या दरम्यान स्कोअर असलेल्या लोकांना ९.६५ टक्के दराने गृहकर्ज मिळू शकते.
बँक ऑफ बडोदा गृह कर्ज
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा 8.40 ते 10.60 टक्के व्याजदराने गृहकर्ज देत आहे. अचूक व्याजदर अर्जदारांच्या कर्ज मर्यादा आणि क्रेडिट स्कोअरवर आधारित आहेत. हे दर पगारदार आणि पगार नसलेल्या दोन्ही व्यक्तींना लागू आहेत.
पंजाब नॅशनल बँकेचे गृहकर्ज
सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक 8.40 ते 10.10 टक्के वार्षिक व्याजदराने गृहकर्ज देते. अचूक व्याजदर LTV (कर्ज ते मूल्य) गुणोत्तर, कर्जाची रक्कम आणि क्रेडिट स्कोअरवर आधारित आहे.
एचडीएफसी बँकेचे गृहकर्ज
एचडीएफसी बँक, खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी, दरवर्षी 8.50 ते 9.15 टक्के दरम्यान आहे. हे दर पगारदार वर्ग आणि स्वयंरोजगार अशा दोघांनाही लागू आहेत. दोन्ही श्रेणींसाठी मानक गृहकर्ज दर 8.75 टक्के आणि 9.40 टक्के दरम्यान आहेत.
SBI बँकेचे गृहकर्ज
गृहकर्जावरील व्याज दर 8.6 टक्के आणि 9.65 टक्के दरम्यान आहे. CIBIL स्कोअर 750 पेक्षा जास्त असलेल्यांना 8.6 टक्के दराने व्याज आकारले जात आहे. स्कोअर 700 ते 749 दरम्यान असेल तर 8.7 टक्के व्याजदराने कर्ज दिले जात आहे.
यानंतर, 650 ते 699 गुणांसह कर्ज घेणाऱ्यांना 9.45 टक्के दराने कर्ज दिले जात आहे. 550 ते 649 दरम्यान सिबिल स्कोअर असलेल्यांकडून 9.65 टक्के दराने व्याज आकारले जात आहे.
PNB बँकेचे गृहकर्ज
त्याच वेळी, सार्वजनिक क्षेत्रातील बँक PNB कडून 8.40 टक्के ते 10.10 टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज दिले जात आहे. अचूक व्याज दर LTV, प्रमाण, कर्जाची रक्कम आणि क्रेडिट स्कोअरवर आधारित आहे.