Reserve Bank of India : आज प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांसाठी लॉकरची सुविधा पुरवते. बरेच लोक त्यांच्या मौल्यवान वस्तू घरी ठेवण्याऐवजी बँक लॉकरमध्ये ठेवणे अधिक सुरक्षित मानतात, ही चांगली गोष्ट असली तरी देखील बँक लॉकरमध्ये तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवणे सुरक्षित आहे का? असा प्रश्न पडतो.
जर बँकेतून चोरी झाली किंवा काही चूक झाली तर त्यांना त्यांच्या मौल्यवान वस्तू परत मिळतील का? आज आपण बँक लॉकरचे याबाबत काय नियम आहेत आणि बँक लॉकरमधून काही गोष्टी गायब झाल्यास काय होईल? जाणून घेणार आहोत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक लॉकर्सबाबत अनेक नियम बदलले आहेत. नवीन नियमानुसार, जर एखाद्या बँकेच्या ग्राहकाने आपला माल बँक लॉकरमध्ये ठेवला आणि तो माल खराब झाला तर ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही.
मालाचे नुकसान झाल्यास बँक जबाबदार असेल. माल खराब झाल्यास किंवा चोरीला गेल्यास बँकेला नुकसान भरपाई द्यावी लागेल. बँकेत आगीमुळे माल जळून खाक झाला तरी बँक संपूर्ण नुकसान भरून काढेल.
बँक लॉकर सुविधा कशी मिळवायची?
आता बँक लॉकरच्या सुविधेचा लाभ कसा घ्यायचा? तर यासाठी तुम्हाला प्रथम बँकेत जावे लागेल. जिथे तुम्हाला तुमचे लॉकर मिळवण्यासाठी बँकेत अर्ज सादर करावा लागेल. बँक लॉकरमध्ये वस्तू ठेवण्यासाठी बँक तुमच्याकडून वार्षिक आधारावर काही भाडे आकारले, म्हणजेच तुम्ही जे लॉकर घ्याल त्याची तुम्हाला फी भरावी लागते.













