FD rates : प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांसाठी विविध फायदे घेऊन येत असते. काही जणांना याबाबत माहिती नसते. त्यामुळे त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही. ग्राहक आता जास्त व्याज देणाऱ्या बँकेत खाते चालू करतात. सध्या अशीच एक सरकारी बँक आहे जी आपल्या सर्वात जास्त व्याज देत आहे.
अहवालानुसार, सरकारी बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा एफडीवर सर्वात जास्त व्याज देत असून बँक ऑफ बडोदा तीन वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज मिळते. गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये होते. देशातील एकूण एफडी ठेवींमध्ये बँक ऑफ बडोदाचा हिस्सा 6 टक्के इतका असतो. सरकारी बँकांच्या एकूण एफडीमध्ये बँक ऑफ बडोदाचा 10 टक्के हिस्सा आहे.
कॅनरा बँक तीन वर्षांच्या एफडीवर ६.८ टक्के व्याज मिळते. कॅनरा बँकेत जमा केलेली 1 लाख रुपयांच्या रकमेत तीन वर्षांनी वाढ होऊन 1.22 लाख रुपये होईल. देशातील एकूण एफडीमध्ये कॅनरा बँकेचा 12 टक्के हिस्सा आहे.
पंजाब नॅशनल बँक तीन वर्षांच्या एफडीवर ७ टक्के व्याज असून गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.23 लाख रुपये इतकी होते. देशातील एकूण एफडी ठेवींमध्ये पंजाब नॅशनल बँकेचा हिस्सा ६ टक्के इतका आहे. येथे सरकारी बँकांच्या एकूण एफडीमध्ये पीएनबीचा 10 टक्के हिस्सा आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया तसेच इंडियन ओव्हरसीज बँक तीन वर्षांच्या एफडीवर ६.५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. या बँकांमध्ये गुंतवलेली 1 लाख रुपयांच्या रकमेत तीन वर्षांत वाढ होऊन 1.21 लाख रुपये होते. देशातील एकूण एफडीपैकी 11 टक्के एफडी युनियन बँक ऑफ इंडियामध्ये केल्या जातात.
स्टेट बँक ऑफ इंडिया तीन वर्षांच्या FD वर व्याज देण्याच्या बाबतीत चौथ्या स्थानावर असून SBI तीन वर्षांच्या FD वर वार्षिक 6.5 टक्के दराने व्याज मिळते. एसबीआयमध्ये केलेली 1 लाख रुपयांची एफडी रक्कम तीन वर्षांत वाढून 1.21 लाख रुपये होते.
तसेच युको बँक तीन वर्षांच्या एफडीवर 6.3 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळते. गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.21 लाख रुपये होते.