Fixed Deposit : आवर्ती ठेव (RD) हे नेहमी पैशांची बचत आणि गुंतवणूक करण्यासाठी सर्वात पसंतीचे आणि सुरक्षित माध्यम मानले जाते. म्हणूनच येथे गुंतवणूक करणाऱ्यांची देखील संख्या खूप जास्त आहे. देशातील प्रत्येक बँक तुम्हाला आरडी स्कीममध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देते. तुम्ही तुमचे पैसे वेगवेगळ्या बँकांच्या आरडी स्कीममध्ये जमा करू शकता. बँकानुसार एफडीवरील व्याजदर देखील वेगवगेळे असतात.
याशिवाय तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्येही गुंतवू शकता. पोस्टाद्वारे देखील तुम्हाला RD ची सुविधा मिळते. अशा परिस्थितीत, तुम्हाला हे जाणून घेणे महत्वाचे आहे की तुम्हाला कुठे गुंतवणूक करणे जास्त फायद्याचे ठरेल. आज आपण स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC बँक आणि पोस्ट ऑफिसच्या RD ची तुलना करणार आहोत.
व्याज दर
सरकारने डिसेंबर तिमाहीसाठी 5-वर्षीय आरडी योजनेवरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यानंतर आता ग्राहकांना वार्षिक 6.5 टक्क्यांऐवजी 6.7 टक्के व्याजदराचा लाभ मिळणार आहे. हा व्याजदर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि HDFC बँक या दोघांसाठी आहे. SBI 1 वर्ष ते 10 वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या RD साठी 5.75 ते 7 टक्के व्याजदर देत आहे, तर HDFC बँक RD साठी 4.50 ते 7 टक्के व्याजदर देत आहे.
पोस्ट ऑफिस आरडी
इंडिया पोस्टच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 5 वर्षांचे आरडी खाते उघडल्यानंतर, दरमहा किमान 100 रुपये जमा करावे लागतील. अद्ययावत माहितीनुसार, ग्राहकांना वार्षिक 6.7 टक्के दराने व्याज दिले जाते.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना RD वर वार्षिक 6.50 टक्के ते 6.80 टक्के व्याजदर देते. तर ज्येष्ठ नागरिक श्रेणीतील ग्राहकांना वार्षिक 7 टक्के ते 7.50 टक्के व्याज दिले जाते. तुम्ही बँकेत तुमची गुंतवणूक 100 रुपयांपासून 1 वर्ष ते 10 वर्षांसाठी सुरू करू शकता.
एचडीएफसी बँक
HDFC बँक आपल्या ग्राहकांना RD वर 4.5 टक्के ते 7 टक्के व्याजाचा लाभ देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीतील ग्राहकांसाठी 5 टक्के ते 7.75 टक्के व्याजदर आहे. या बँकेत तुम्ही तुमची गुंतवणूक 6 महिने ते 10 वर्षांसाठी 1000 रुपयांपासून सुरू करू शकता.