श्रीमंतांच्या यादीत पुन्हा गौतम अदानीचं वर्चस्व, एका दिवसातच वाढली ‘इतकी’ संपत्ती; अब्जाधीशांच्या यादीत अंबानीला टाकणार का मागे ?

Published on -

Gautam Adani News : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे गौतम अदानी हे देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अनुक्रमे पहिले आणि दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून पहिल्या स्थानावर काबीज आहेत. पण आता अंबानी यांची ही जागा धोक्यात आली आहे.

कारण की भारतातील दुसऱ्या क्रमात श्रीमंत व्यक्तीच्या संपत्तीत गेल्या गेल्या आठवड्यापासून सातत्याने वाढ होत आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली असून पाच राज्यांतील निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारातील वाढीदरम्यान अदानी स्टॉक्सही रॉकेटच्या वेगाने धावत आहे. याचा परिणाम म्हणून गौतम अदानी यांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत गौतम अदानी यांची आगेकूच सुरू आहे.

जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत Gautam Adani हे नुकत्याच काही दिवसांपूर्वी 20 नंबर वर विराजमान होते. मात्र आता त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली असल्याने ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत 16 व्या क्रमांकावर आले आहेत. या यादीत मुकेश अंबानी हे 15 व्या क्रमांकावर आहेत.

गौतम अदानींची संपत्ती किती ?

गौतम अदानी यांच्या नेट वर्थमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. हाती आलेल्या एका आकडेवारीनुसार, गेल्या 6 व्यापारी दिवसांमध्ये त्यांच्या Net Worth मध्ये 50,000 कोटी रुपयांची जोरदार वाढ झाली आहे. विशेष असे की, सोमवारी शेअर बाजारात सूचिबद्ध गौतम अदानी यांच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यानंतर त्यांची एकूण संपत्ती अचानक 4.41 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 3,677 कोटी रुपयांनी वाढली आहे. म्हणजे आता गौतम अदानी यांची संपत्ती 70.2 बिलियन डॉलर एवढी झाली आहे.

संपत्तीत झालेली ही विक्रमी वाढ आता त्यांना जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत सोळाव्या क्रमांकावर घेऊन गेली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी ते या यादीत विसाव्या स्थानावर होते. तथापि अजूनही गौतम अदानी हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पहिल्या क्रमांकावर अजूनही रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानीचं काबीज आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe