Indian Railways : तुमच्यापैकी अनेकजण रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेचा प्रवास हा सर्वात सुरक्षित आणि आरामदायी मानला जातो. रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी अनेक सुविधा आणत असते. अनेकांना त्या माहिती नसतात.
प्रवास करताना सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे तिकीट. तुम्हाला तिकिटाशिवाय रेल्वेचा प्रवास करता येत नाही. अनेकजण रेल्वेचे तिकीट अगोदरच बुक करतात, तर काही जण हेच तिकीट रद्द करतात. परंतु अनेकांना त्यावर कसा परतावा मिळवायचा ते माहिती नसते. त्यामुळे त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही.
अशा परिस्थितीत रेल्वेचे तिकीट बुक करण्यापूर्वी तुम्हाला हे जाणून घेणे गरजेचे आहे की, जर तुम्ही तत्काळ तिकीट रद्द केले तर त्यावर तुम्हाला किती परतावा मिळेल. कारण तत्काळ तिकीट बुकिंग रद्द केल्यांनतर आयआरसीटीसी तुम्हाला कसा आणि परतावा देते हे अनेकदा लोकांना माहीत नसते.
असा मिळवा तिकीट रद्द करून परतावा
सर्वात अगोदर हे लक्षात घ्या की तत्काळ तिकिटांचे रद्द करण्याचे नियम तुम्ही हे तिकीट ऑनलाइन बुक केले होते की ऑफलाइन यावर अवलंबून असते. समजा, जर तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक केले असल्यास त्याचा चार्ट तयार होईपर्यंत तुमचे तिकीट प्रतीक्षा यादीत असेल आणि तुमचे तिकीट आपोआप रद्द केले जाते.
यानंतर, समजा पुढील काही दिवसांत तिकिटाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तर दुसरीकडे, समजा तुम्ही ऑफलाइन रेल्वे आरक्षण काउंटरवरून तिकीट घेतले असल्यास तर तुम्हाला तिकीट रद्द करण्यासाठी पुन्हा काउंटरवर जावे लागणार आहे.
सविस्तर जाणून घ्या ई-तिकीट रद्द करण्याचे नियम
हे लक्षात ठेवा की समजा तुम्ही कन्फर्म तत्काळ तिकीट रद्द केले तर त्यावर तुम्हाला कोणताही परतावा देण्यात येत नाही. आकस्मिक रद्दीकरण आणि प्रतीक्षा यादीतील तत्काळ तिकीट रद्द करण्यासाठी, सध्याच्या रेल्वे नियमांनुसार शुल्क करण्यात येईल. तत्काळ ई-तिकीटे आंशिक रद्द करण्याची परवानगी असते.