LIC Policy : LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. विमा संरक्षण मिळण्यासाठी लोक प्रामुख्याने LIC ची निवड करतात. LIC ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या लाभदायी पॉलिसी देत आलीय. अशातच आज आपण LIC ची अशीच एक योजना पाहणार आहोत, जी तुम्हाला अगदी कमी गुंतवणुकीत उत्तम परतावा ऑफर करत आहे.
बहुतेक लोकांना अशा योजनेत गुंतवणूक करायची असते जिथून त्यांना प्रत्येक वेळी जास्तीत जास्त परतावा मिळू शकतो. परंतु योग्य गुंतवणूक शोधणे फार कठीण असते. प्रत्येक वेळी नफा मिळवणे प्रत्येकाच्या आवाक्यात नसते. अनेक वेळा गुंतवणूकदारांनाही मोठे नुकसान सहन करावे लागते. अशातच, जर तुम्हाला कोणत्याही तणावाशिवाय किंवा जोखीम न घेता गुंतवणूक करायची असेल, तर एलआयसीची ही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. या स्कीममध्ये तुम्हाला दरमहा फक्त 2000 रुपये गुंतवावे लागतील आणि तुम्हाला 48 लाख रुपये मिळतील. चला या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया..
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) गुंतवणूकदारांसाठी विविध योजना चालवत आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना बंपर नफा मिळतो. लोक LIC मध्ये सहज गुंतवणूक करू शकतात कारण ही एक सरकारी कंपनी आहे जी अनेक दशकांपासून चालत आहे. आज आम्ही LIC प्लॅन नंबर 914 बद्दल बोलत आहोत, जो काही अर्थाने खूप खास आहे. या पॉलिसीमधून तुम्ही प्रचंड नफा कमवू शकता.
पॉलिसी घेण्यासाठी पात्रता
पॉलिसी घेण्यासाठी वयोमर्यादा 8 वर्षे ते 55 वर्षे दरम्यान असावी.
योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किमान 12 वर्षे आणि कमाल 35 वर्षे कालावधी निश्चित करावा लागेल.
तुम्हाला 1 लाख रुपयांची विमा रक्कम राखावी लागेल.
48 लाखांचा परतावा कसा मिळणार?
जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 18 व्या वर्षी प्लान क्रमांक 914 सुरू केला तर त्याला 10 लाख रुपयांचा विमा मिळेल. शिवाय, तुमच्याकडे जगण्यासाठी ३५ वर्षे असतील. अशा परिस्थितीत, या प्लॅनची किंमत वार्षिक 24391 रुपये असेल म्हणजेच प्रत्येक महिन्याला 2079 रुपयांचा प्रीमियम जमा करावा लागेल. 35 वर्षानंतर, गुंतवणूकदाराला मॅच्युरिटी रक्कम म्हणून 48 लाख 40 हजार रुपयांचा परतावा मिळेल.