Personal Loan : ‘या’ बँका देत आहेत सर्वात स्वस्त पर्सनल लोन; बघा व्याजदर…

Published on -

Personal Loan : अचानक मोठ्या पैशांची गरज भासते तेव्हा लोकं वैयक्तिक कर्जाची मदत घेतात. पण वैयक्तिक कर्ज हे इतर कर्जाच्या तुलनेत महाग असते, गृहकर्ज, कार लोन, गोल्ड लोन यासारख्या इतर कर्जांच्या तुलनेत वैयक्तिक कर्जावर सर्वाधिक व्याजदर असतो. त्यामुळे पर्सनल लोन तेव्हाच घेतले पाहिजे जेव्हा मोठी गरज असते आणि दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसतो. प्रत्येक बँका वेगवगेळ्या दराने कर्ज ऑफर करतात, अशातच वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही वेगवेगळ्या बँकांच्या ऑफर्सची तुलना केली पाहिजे जेणेकरून तम्ही चांगल्या ऑफर यामध्ये कर्ज मिळवू शकाल.

पर्सनल लोन जिथून सर्वात कमी व्याज आहे तेथून घेतले पाहिजे. तसेच तुम्ही प्रक्रिया शुल्काचीही तुलना केली पाहिजे. लक्षात घ्या ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर चांगला आहे त्यांना वैयक्तिक कर्जावर योग्य व्याजदर मिळतो. दरम्यान, आज आपण अशा 5 बँकांबद्दल बोलणार आहोत ज्या वैयक्तिक कर्जावर सर्वात कमी व्याजदर देतात.

बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्ज दर

बँक ऑफ बडोदा 50 हजार ते 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10.35 टक्के ते 17.50 टक्के व्याजदर देत आहे. येथे कालावधी 48 ते 60 महिन्यांपर्यंत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज दर

बँक ऑफ महाराष्ट्र 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10 टक्के किंवा त्याहून अधिक व्याज दर (बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोन रेट) देत आहे. यातील कालावधी 84 महिन्यांचा असेल.

पंजाब आणि सिंध बँक वैयक्तिक कर्ज दर

पंजाब आणि सिंध बँक 3 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर (पंजाब सिंध बँक वैयक्तिक कर्ज दर) 10.15 टक्के ते 12.80 टक्के व्याजदर देत आहे. यातील कालावधी 60 महिन्यांपर्यंत आहे.

बँक ऑफ इंडिया वैयक्तिक कर्ज दर

बँक ऑफ इंडिया 20 लाखांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10.25 किंवा त्याहून अधिक व्याजदर (बँक ऑफ इंडिया पर्सनल लोन रेट) देत आहे. येथे कालावधी 84 महिन्यांपर्यंत आहे.

इंडसइंड बँक वैयक्तिक कर्ज दर

इंडसइंड बँक 30 हजार किंवा त्याहून अधिक आणि 25 लाखांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10.25 टक्के ते 32.02 टक्के व्याजदर देत आहे. येथे कार्यकाळ 12 ते 60 महिन्यांपर्यंत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!