Post Office Scheme : आपल्या देशात आजही सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दाखवले जात आहे. अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे नवयुवक तरुण आता शेअर मार्केट मधून चांगला परतावा मिळत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. काही रिपोर्ट मधून तशी माहिती समोर येत आहे.
मात्र असे असले तरी आजही आपल्या देशात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे. कष्टाने कमावलेला पैसा वाया जाऊ नये यासाठी अनेक सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याला महत्त्व दाखवतात. अनेकजण बचत योजनांमध्ये पैसे गुंतवतात. काहीजण बँकेच्या एफडी योजनेत पैसे गुंतवतात.
दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूकदारांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर ते पैसे काही वर्षात दोन लाख रुपये होणार आहेत.
म्हणजेच पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होणार आहेत. यामुळे जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात पोस्ट ऑफिसच्या एखाद्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणती आहे ही योजना
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र ही योजना. लोक महागाईच्या काळात उत्पन्न वाढवण्याचा विचार करतात. यासाठी अनेक जण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करतात.
किसान विकास पत्र ही देखील पोस्ट ऑफिसची अशीच एक लोकप्रिय बचत योजना आहे. टपाल विभागाच्या या योजनेत केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे. या योजनेत तुमची एक वेळची गुंतवणूक फक्त 9 वर्षे आणि 7 महिन्यांत दुप्पट होणार आहे.
म्हणजे जर तुम्ही पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र या योजनेत एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 9 वर्षे सात महिन्यांनी तुम्हाला दोन लाख रुपये मिळणार आहेत. किसान विकास पत्रावर दरवर्षी ७.५ टक्के दराने वार्षिक व्याज मिळत आहे.
यात कोणीही एकरकमी गुंतवणूक करू शकतो, तो शेतकरीच पाहिजे असे नाही. म्हणजेच या योजनेचे नाव किसान विकास पत्र असले तरीदेखील या योजनेत सर्वच जण गुंतवणूक करू शकतात.
या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामध्ये गुंतवलेल्या पैशांवर कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा मिळतो. विशेष म्हणजे यात पैसे गुंतवले आणि तुम्हाला मध्येच पैशांची गरज पडली तर अडीच वर्षानंतर तुम्हाला यातील पैसे काढता येतात.