Post Office Scheme : पोस्टाची दुप्पट नफा देणारी योजना! या जबरदस्त योजनेत ४ लाख गुंतवल्यास मिळतील ८ लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर

Ahmednagarlive24 office
Updated:
Post Office Scheme

Post Office Scheme : भारत सरकारकडून देशातील नागरिकांना गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिसद्वारे अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा फायदा होत आहे. पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून नागरिकांना बंपर परतावा मिळत आहे.

पोस्ट ऑफिसद्वारे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी किसान विकास पत्र (KVP) ही योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये छोट्या बचतेसाठी गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकतात. या योजेनच्या व्याजदरात देखील सरकारकडून वाढ करण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी किसान विकास पत्र योजना चालवली जात आहे. या वर्षीपासून या योजेनच्या व्याजदरात वार्षिक ७.२ टक्क्यांवरून ७.५ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे या योजनेत गुंतवलेले पैसे लवकरच दुप्पट होऊ शकतात.

किसान विकास पत्र (KVP) म्हणजे काय?

किसान पत्र योजना देशातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. ही योजना एकरकमी गुंतवणूक करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. तुम्हालाही या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडून गुंतवणूक करू शकता.

किसान पत्र योजना शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आली असून या योजनेत शेतकरी एकरकमी पैसे गुंतवणूक करू शकतात. तसेच तुम्ही किमान १ हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून या योजनेत पैसे गुंतवू शकता.

किती वेळात पैसे दुप्पट होतील

किसान पत्र योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही वार्षिक ७.५% दराने परतावा मिळवू शकता. या योजनेत पैसे दुप्पट होण्यासाठी 120 महिन्यांचा कालावधी लागत होता. मात्र आता 115 महिन्यांत म्हणजे फक्त 9 वर्षे आणि 7 महिन्यांत दुप्पट नफा मिळत आहे.

जर किसान पत्र योजनेमध्ये तुम्ही एकरकमी ४ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला ११५ महिन्यांमध्ये ८ लाख रुपये मिळतील. तसेच या योजनेमध्ये चक्रीवाढ व्याजाचा देखील लाभ मिळतो. त्यामुळे मोठा फायदा होत आहे.

या योजनेतील गुंतवणुकीवर ७.५ टक्के दराने व्याज दिले जात आहे. शेतकऱ्यांना गुंतवणूक करण्यासाठी ही एक जबरदस्त योजना आहे. काही महिन्यांमध्ये दुप्पट नफा मिळत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe