Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची मालामाल करणारी योजना! दररोज गुंतवा ५० रुपये आणि मिळवा ३५ लाख रुपये, अशी करा गुंतवणूक

Ahmednagarlive24 office
Published:
Post Office Scheme

Post Office Scheme : तुम्हीही पैशांची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसच्या भन्नाट योजना आहेत. या योजनेमध्ये पैसे गुंतवणूक करून तुम्ही आयुष्यभर बसून खाल इतका परतावा या योजनेमधून मिळत आहे.

तसेच पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यावर कोणतीही जोखीम नाही. कारण या सरकारच्या योजना आहेत. त्यामुळे तुमचे पैसे बुडण्याची कसलीही भीती नाही. तुम्ही पोस्टाच्या कोणत्याही योजनेमध्ये बिनधास्त गुंतवणूक करू शकता.

आज तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही कमी गुंतवणूक करून जवळपास तब्बल ३५ लाख रुपयांचा परतावा मिळवू शकता. त्यामुळे गुंतवणुकीचा एक चांगला मार्ग तुमच्यासाठी उपलब्ध झाला आहे.

पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुरक्षा योजनेमध्ये तुम्ही दरमहा पैसे गुंतवणूक करून सरकारकडून ३५ लाख रुपये मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया योजनेविषयी.

दरमहा 1500 रुपये जमा करा

भारतीय पोस्ट ऑफिसकडून ग्रामीण भागांना विकसित करण्यासाठी आणि तेथील लोकांना गुंतवणुकीचा मार्ग मिळण्यासाठी अनेक योजना आखल्या जात आहेत. तुम्हीही ग्राम विकास योजनेमध्ये गुंतवणूक करून दरमहा १५०० रुपये जमा करून चांगला नफा कमवू शकता. जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये नियमितपणे गुंतवणूक केली तर तुम्हाला ३१ तर ३५ लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो.

जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर त्याचा मासिक प्रीमियम 55 वर्षांसाठी 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल.

तुम्ही 55 वर्षांसाठी पॉलिसी खरेदी केली असेल तर तुम्हाला 31.60 लाख रुपये मिळतील. तसेच 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मुदतीनंतर दिले जातील.

गुंतवणुकीचा नियम

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी काही नियम आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत. या योजनेमध्ये भारताचे १९ ते ५५ वयोगटातील नागरिक गुंतवणूक करू शकतात.

तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक हफ्ता घेऊ शकता. तुमच्या बजेटनुसार तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता.

जर तुम्हाला या योजनेमधील गुंतवणूक केलेले पैसे मुदतीपूर्वीच काढायचे असतील तरीही तुम्ही काढू शकता. मात्र ३ वर्षाच्या आगोदर तुम्हाला या योजनेमध्ये गुंतवणूक केलेले पैसे काढता येणार नाहीत. 3 वर्षांनी तुम्ही या योजनेतील पैसे सहज काढू शकता आणि योजना बंद करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe