Post Office Scheme : फक्त 100 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील अडीच लाख, बघा पोस्टाची खास योजना !

Ahmednagarlive24 office
Published:
Post Office Scheme

Post Office Scheme : कोणत्याही संकटाच्या वेळी आपली बचतच आपल्याला उपयोगी पडते. कोरोनाच्या काळात बचतीचे महत्व सगळ्यांनाच समजले आहे. म्हणूनच सध्या पप्रत्येकजण बचतकडे जास्त लक्ष देत आहे, सरकार देखील एका पेक्षा एक बचत योजना बाजारात आणत आहे. त्यापैकी पोस्ट ऑफिसच्या बचत योजना आहेत.

पोस्ट ऑफिस अनेक बचत योजना राबवते, ज्या लोकांसाठी खूप फायद्याच्या ठरतात. तुम्ही अगदी कमी पैसे गुंतवून चांगली बचत करू शकता. पोस्टाच्या आज आपण अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे फक्त 100 रुपये बचत करून मोठा निधी जमा करू शकता.

तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये आवर्ती ठेव खाते (RD) उघडू शकता. यामध्ये किमान 100 रुपयांची गुंतवणूक करता येईल. ही गुंतवणूक तुम्ही 5 वर्ष चालू ठेवली तर तुम्ही 1.80 लाख रुपयांचा निधी गोळा कराल. सध्या, RD वर 6.7 टक्के व्याज मिळत आहे. म्हणजे 5 वर्षात तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 32,972 रुपये व्याज मिळेल. तुम्हाला ५ वर्षांनंतर एकूण रक्कम २ लाखाच्या पुढे मिळेल.

अशातच जर तुम्ही तुम्ही पोस्ट ऑफिसऐवजी SIP मध्ये १०० रुपये दराने दरमहा 3,000 रुपये वाचवल्यास. तुम्हाला 5 वर्षात 1.80 लाख रुपयांच्या ठेवीवर 67,459 रुपये व्याज मिळेल. SIP वर प्रति वर्ष सरासरी 12 टक्के परतावा मिळतो. जरी कधीकधी ते 18-20 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. मग तुमचा परतावाच फक्त 1.80 लाख रुपये जास्त असेल.

अशा प्रकारे, पोस्ट ऑफिस RD मध्ये तुमची 1.80 लाख रुपयांची ठेव 2,12,972 रुपयांपर्यंत पोहोचेल. तर SIP मध्ये ही रक्कम 5 वर्षात 12% च्या परताव्यावर 2,47,459 रुपये होईल. SIP चा  परतावा यापेक्षा थोडा जास्त असल्यास, तुमचा परतावा जास्त असेल.

पण लक्षात ठेवा SIP मध्ये तुम्हाला दरमहा किमान 500 रुपये जमा करावे लागतील, तर RD मध्ये तुम्ही महिन्यात फक्त 100 रुपये जमा करून खाते उघडू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये जमा केलेल्या रकमेवर सरकारची हमी असली तरी, एसआयपीमध्ये जमा केलेली रक्कम शेअर बाजाराच्या जोखमीच्या अधीन राहते. एसआयपीमध्ये तुम्हाला सुरक्षितता मिळत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe