आपण आजवर अनके सक्सेस स्टोरी ऐकल्या असतील. एखाद्या विद्यार्थ्यास या मिळालंनाही म्हणून त्याने कंपनी उभी केली, किंवा शेतीतून कामे करत मोठे यश मिळवले आदी. परंतु आज आपण अशा एका अशा अभिनेत्रीची सक्सेस स्टोरी पाहणार आहोत की जिने आपले सक्सेफुल करिअर सोडले आणि व्यवसायात पाऊल टाकले. आज त्या अभिनेत्रीने केवळ २ वर्षात ८०० कोटींची कमाई केली आहे.
आशका गोराडिया असे या अभिनेत्रीचे नाव आहे. अभिनय क्षेत्रात यशाच्या शिखरावर असताना तिने हे करिअर सोडले व ती बीझन्समध्ये आली. तिने आज व्यवसाय क्षेत्रात स्वतःची करोडोंची कंपनी उभी केली आहे. चला तिच्या या सक्सेस स्टोरीबद्दल जाणून घेऊयात

‘असा’ सुरु केला व्यवसाय
आशका गोराडियाने आपल्या करिअरला सुरवात केली अन ती लोकप्रियही झाली. 2019 मध्ये तिने अभिनयातून ब्रेक घेतला. आशकाला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता, म्हणून तिने अभिनय सोडला आणि तिचे कॉलेज मित्र आशुतोष वलानी आणि प्रियांक शाह यांच्यासोबत रेनी कॉस्मेटिक्स कंपनी सुरू केली. तिला आज अभिनय क्षेत्रापेक्षा तिच्या कंपनीत तिला यश मिळाले. तिने रेनी कॉस्मेटिक्स नावाचा ब्रँड केला व विविध कॉस्मेटिक प्रोडक्ट लोंक केले.
पाहता पाहता उभी राहिली करोडोंची कंपनी
2020 मध्ये तिची कंपनी सुरु झाली. रेनी कॉस्मेटिक्सने अवघ्या दोन वर्षांत 100 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 800 कोटी रुपयांचे व्हॅल्युएशन आता या कंपनीचे झाले आहे. एका मुलाखतीमध्ये आशका गोराडियाच्या पार्टनर प्रियांक शाह यांनी सांगितले की, रेनी कॉस्मेटिक्स कंपनीचे टार्गेट आता 2024 मध्ये एकाच वर्षात सुमारे 400 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू निर्माण करण्याचे लक्ष आहे असे म्हटले होते. आज या कंपनीचे 200 हून अधिक कॉस्मेटिक्स प्रोडक्टस आहेत. त्यांची प्रोडक्ट ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. त्यांचे सध्या 600 ऑफलाइन स्टोअर्स आहेत.