Reliance Share Price: गुंतवणूकदारांमध्ये उत्साह! रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारले…वाचा सध्याची स्थिती

Published on -

Reliance Share Price:- गेल्या काही दिवसापासून आपल्याला शेअर मार्केटमध्ये सातत्याने घसरण दिसून येत असून अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव सध्या बाजारावर दिसून येत आहे. तसाच प्रभाव आज देखील मार्केटवर दिसून आला. आज 11 ऑगस्ट 2025 वार सोमवारी देखील शेअर मार्केटची ओपनिंग मुळातच घसरणीने झाली. परंतु त्यानंतरच्या कालावधीत मात्र परिस्थिती सुधारली व सेन्सेक्स सध्या 300.29 अंकांच्या वाढीसह 80177.36 वर पोहोचला आहे तर निफ्टी देखील 100.86 अंकांनी वधारली व 24464.15 वर पोहोचली आहे. बाजारातील या सकारात्मक परिस्थितीचा परिणाम हा रिलायन्सच्या शेअरवर दिसून आला असून या शेअर्समध्ये देखील +8.9 अंकांनी वाढ झाली आहे व त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये एक उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

रिलायन्स शेअरची सध्याची स्थिती?

आज 11 ऑगस्ट 2025 वार सोमवार असून जेव्हा मार्केट ओपन झाले तेव्हा रिलायन्स शेअरची सुरुवातीची किंमत 1370 रुपये इतकी होती व आजची किंमत ही कालच्या बंद किमतीच्या म्हणजेच 1368 रुपयेपेक्षा जास्त दिसून येत आहे. आजची या शेअरची नीचांकी पातळी 1361 रुपये तर उचांकी पातळी ही 1378 रुपये इतकी आहे. इतकेच नाहीतर रिलायन्सचा शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 1551 रुपये तर नीचांकी पातळी 1115 रुपये इतकी आहे. आता सध्या हा शेअर 1376.70 रुपयांवर ट्रेड करत असून यामध्ये आज 0.65 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.

या शेअर्सने आतापर्यंत गुंतवणूकदारांना दिलेला परतावा

जर रिलायन्स शेअरने गुंतवणूकदारांना दिलेल्या परतावा जर बघितला तर एक वर्षाच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना -6.71%, सहा महिन्याच्या गुंतवणुकीवर +9.71%, तीन महिन्याच्या गुंतवणुकीवर -0.13% तर एक महिन्याच्या गुंतवणुकीवर -9.35% इतका परतावा दिलेला आहे. सध्या या कंपनीचे मार्केट कॅप 1863016 कोटी रुपये इतकी आहे.

कुणाकडे किती टक्के आहेत या कंपनीचे शेअर्स?

जर आपण रिलायन्स कंपनीची शेअर होल्डिंग बघितली तर प्रमोटर्सकडे या कंपनीचे 50.07% शेअर्स आहेत. तर वैयक्तिक गुंतवणूकदारांकडे 8.48% शेअर्स आहेत. त्यासोबतच म्युच्युअल फंड 9.32%, इन्शुरन्स कंपनीत 9.18%,FPI म्हणजेच विदेशी गुंतवणूकदारांकडे 19.08% आणि इतरांकडे 3.84% शेअर्स आहेत. ही जी शेअर होल्डिंगची आकडेवारी आहे ती जून 2025 या कालावधीची आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe