एसबीआयकडून 20 वर्ष कालावधीसाठी 20 लाख रुपयांचे गृह कर्ज घेतले तर कितीचा मासिक हप्ता भरावा लागेल ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

एसबीआय बँक गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनेतारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, शेती कर्ज, वैयक्तिक कर्ज असे विविध प्रकारचे कर्ज आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देते. बँकेकडून परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर आपल्या ग्राहकांना कर्ज दिले जात आहे.

Tejas B Shelar
Published:
SBI Home Loan News

SBI Home Loan News : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक. भारतात एकूण 12 सरकारी बँका आहेत. या बारा बँकांपैकी सर्वात मोठी बँक म्हणजेच एस बी आय. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआय आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी परवडणाऱ्या इंटरेस्ट रेटवर विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते.

एसबीआय बँक गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनेतारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, शेती कर्ज, वैयक्तिक कर्ज असे विविध प्रकारचे कर्ज आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देते. बँकेकडून परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर आपल्या ग्राहकांना कर्ज दिले जात आहे.

दरम्यान आज आपण एसबीआय बँकेच्या गृह कर्जाची माहिती जाणून घेणार आहोत. गृहकर्जासाठी एसबीआय आपल्या ग्राहकांकडून किती व्याज वसूल करते या संदर्भात आज आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एसबीआय बँकेचे गृह कर्ज घेणे फायदेशीर आहे का?

एसबीआय बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.50% या व्याजदररात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. मात्र हे बँकेचे किमान व्याजदर आहे. या दरात सर्वांनाच कर्ज मिळत नाही.

ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच या इंटरेस्ट रेट वर कर्ज मिळू शकते. आठशेच्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना या किमान व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध होणे शक्य आहे.

अर्थातच जर तुमचा सिबिल स्कोर 800 किंवा याच्या आसपास असेल तर तुम्हाला एसबीआय बँकेकडून किमान 8.50% या इंटरेस्ट रेट वर गृहकर्ज मिळू शकते. अन्य प्रायव्हेट बँकांचे तुलना केली असता एसबीआय बँकेचे हे व्याजदर ग्राहकांसाठी किफायतशीर आहेत.

20 लाखाचे कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार

जर एखाद्या ग्राहकाला वीस लाख रुपयांचे गृहकर्ज 8.50 टक्के दराने वीस वर्ष कालावधीसाठी मंजूर करण्यात आले तर त्या ग्राहकाला 17 हजार 356 रुपयाचा मासिक हप्ता द्यावा लागणार आहे.

म्हणजेच सदर व्यक्तीला 20 वर्ष कालावधीत 41 लाख 65 हजार 440 रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजे या काळात 21 लाख 65 हजार 440 रुपये फक्त व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत.

जर हेच कर्ज तीस वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर त्याला पंधरा हजार 378 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. या काळात सदर व्यक्तीला 55 लाख 36 हजार 80 रुपये भरावे लागणार आहेत. अर्थातच या काळात 35 लाख 36 हजार 80 रुपयांचे व्याज भरावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe