Senior Citizen : सध्या बाजारात अनेक प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत, पण ज्येष्ठ नागरिकांना अशा योजनांमध्ये गुंतवणूक करायला आवडते, जिथे कोणत्याही प्रकारची जोखीम नसते, अशातच गुंतवणूकदार मुदत ठेवींमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात. पण मुदत ठेवींवर मिळणारे व्याज हे मर्यादित प्रमाणात असतात. अशास्थितीत तुम्ही गुंतवणुकीसाठी SCSS कडे देखील वळू शकता.
दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. या योजनेत तुम्हाला 8.2 टक्के दराने व्याज दिले जाते. आज आपण ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे फायदे आणि प्रमुख बँकांमध्ये एफडीवर मिळणारे व्याजदर पाहणार आहोत.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत किती गुंतवणूक करू शकता?
SCSS मध्ये 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. यात ठेवीची कमाल मर्यादा 30 लाख रुपये आहे. योजनेमध्ये, रक्कम 1000 च्या पटीत जमा केली जाते. त्याचा परिपक्वता कालावधी 5 वर्षांचा आहे. ठेवीदाराची इच्छा असल्यास, तो ठेव रकमेच्या मुदतपूर्तीनंतर खात्याचा कालावधी तीन वर्षांपर्यंत वाढवू शकतो. हे मॅच्युरिटीच्या 1 वर्षाच्या आत वाढवता येते.
या योजनेत 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती गुंतवणूक करून नफा मिळवू शकते. हे खाते जोडीदारासह एकल किंवा संयुक्त खाते उघडता येते. या योजनेअंतर्गत कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा देखील लाभ मिळतो.
जर तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले तर 5 वर्षानंतर तुम्हाला एकूण 1,41,000 रुपये मिळतील. जरी 2 लाख रुपये गुंतवून तुम्हाला 2,82,000 रुपये मिळतील, आणि 5 लाख रुपये गुंतवून तुम्हाला 7,05,000 रुपये मिळतील. या योजनेत 10 लाख रुपये जमा केल्यावर तुम्हाला 14,10,000 रुपये मिळतील. आणि 20 लाख रुपये जमा केल्यावर तुम्हाला 28,20,000 रुपये आणि 30 लाख रुपये जमा केल्यावर तुम्हाला 42,30,000 रुपये मिळतील.
5 वर्षाच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना किती व्याज मिळेल?
-स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या सर्व नागरिकांना एफडीवर 7.25 टक्के व्याजदर ऑफर करत आहे.
-पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर 7.00 टक्के व्याजदर ऑफर करत आहे.
-एच डी एफ सी बँकेबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला येथे 7. 50 टक्के व्याज दिले जाते.
-ICICI बँक आपल्या सर्व ग्राहकांना 7:50 टक्के व्याजदर देत आहेत.
-अॅक्सिस बँक आपल्या ग्राहकांना 7:60 टक्के दराने व्याज ऑफर करते.