Business News : अलीकडे भारतात एक विशेष ट्रेंड पाहायला मिळत आहे. या नवीन ट्रेंड नुसार आता देशातील तरुण पिढीचा कल नोकरी ऐवजी व्यवसायाकडे अधिक पाहायला मिळत आहे. आता तरुणांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच हे काम अजिबात आवडत नाहीये.
हजारो रुपयांची नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करावा असे स्वप्न आता नवयुवक पाहू लागले आहेत. अनेकांनी तर व्यवसाय सुरू केले आहेत आणि व्यवसायातून आपले स्वतःचे साम्राज्य उभे देखील केले आहे.

दरम्यान जर तुम्हीही सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या रुटीन लाईफला कंटाळा आला असाल आणि नोकरीला सोडून व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशा व्यवसायाची माहिती घेऊन जर चालू आहोत ज्यामध्ये तुम्हाला एक रुपया देखील गुंतवावा लागणार नाही. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या व्यवसायाविषयी सविस्तर.
कोचिंग क्लासेस : जर तुम्ही एखाद्या विषयात पदवीधर असाल तर तुम्ही त्या विषयाचे कोचिंग क्लासेस सुरू करू शकता. मराठी, इंग्लिश, इतिहास, विज्ञान, गणित यांसारख्या विषयांपैकी ज्या विषयात तुम्ही शिक्षण घेतलेले असेल आणि ज्या विषयात तुमची चांगली पकड असेल त्या विषयाचे क्लासेस तुम्ही सुरू करू शकता.
विशेष म्हणजे हे क्लासेस तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सुरू करू शकता. तुम्ही कोचिंगचा व्यवसाय तर ऑफलाईन सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या घरातच कोचिंग क्लासेस सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला झिरो गुंतवणूक लागणार आहे.
ब्लॉगिंग और कंटेंट रायटिंग : जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल तर तुम्ही कंटेंट रायटिंग सुरु करू शकता. तुम्ही मराठी, इंग्लिश किंवा हिंदीत कन्टेन्ट रायटिंगची कामे करू शकता. तुम्ही एखाद्या वेबसाईटसाठी कंटेट रायटिंगचे काम करू शकता किंवा स्वतःची ब्लॉगिंग वेबसाईट तयार करून त्यावर तुम्हाला ज्या विषयावर लिखाण करणे आवडते त्या विषयावर लिखाण करून गुगल ॲडसेन्सच्या माध्यमातून कमाई करू शकता. जर तुम्हाला कंटेंट रायटिंगची कामे शोधायची असतील तर तुम्ही लिंकेडीन सारख्या एप्लीकेशन वर जॉब शोधू शकता. तुम्ही फ्रीलान्सर म्हणून कंटेंट रायटिंगचे काम करू शकता.
ट्रान्सलेटर : जर तुम्ही मराठी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते मराठी किंवा हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी असे ट्रान्सलेशन करण्यात पटाईत असाल तर तुम्ही ट्रान्सलेटर म्हणून घरबसल्या चांगली मोठी कमाई करू शकता. विविध संस्था पार्ट टाइम ट्रान्सलेटर शोधत असतात. तुम्ही अशा कंपन्यांमध्ये पार्ट टाइम ट्रान्सलेटर म्हणून काम सुरू करू शकता.
याशिवाय तुम्ही एखाद्या पब्लिकेशन कंपनीसोबतही काम करू शकता. येथे तुम्हाला पुस्तकांचे ट्रान्सलेशन करावे लागेल. ट्रान्सलेटर म्हणून काम केल्यास तुम्हाला निश्चितच नोकरीपेक्षा जास्त कमाई होऊ शकते. मात्र यासाठी तुम्हाला तुमच्याकडे चांगले ट्रान्सलेशन स्किल असणे आवश्यक आहे.