Vodafone Idea Share Price:- 1 ऑगस्ट 2025 वार शुक्रवारी जेव्हा मार्केट ओपन झाले तेव्हापासून सातत्याने बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी थोड्या कालावधीसाठी काहीशी सुधारणा झाल्याचे दिसले.परंतु आता परत दोन्ही निर्देशांकामध्ये घसरण झालेली आहे. सध्याची ताजी परिस्थिती बघितली तर बीएसई सेन्सेक्स -0.11% घसरला असून या घसरणीसह 81087.66 वर पोहोचला आहे.
तर निफ्टीमध्ये देखील 47.10 अंकांची घसरण झाली असून सध्या 24721.25 वर आहे. त्यासोबतच मार्केटमधील प्रमुख निर्देशांक समजले जाणारे बँक निफ्टीमध्ये देखील -0.26% ची घसरण झाली असून या घसरणीसह बँक निफ्टी 55,815.65 वर आहे. तीच परिस्थिती निफ्टी मिडकॅप 100 मध्ये दिसून येत असून -033% घसरणीसह 57,210.3 वर पोहोचली आहे.

वोडाफोन आयडियाचा शेअर घसरला
ज्याप्रकारे मार्केटची सुरुवात घसरणीसह झाली. अगदी त्याचप्रमाणे वोडाफोन आयडियाच्या शेअरची सुरुवात देखील आज घसरणीसह झाल्याचे दिसून येत आहे. सध्या या शेअरची किंमत बघितली तर त्यामध्ये -1.3% ची घसरण झाली असून सध्या हा शेअर 6.82 रुपयांवर ट्रेड करत आहे. काल म्हणजेच 31 जुलै 2025 रोजी हा शेअर सात रुपये किमतीवर बंद झालेला होता.
त्या तुलनेत सध्या या शेअर्समध्ये मात्र -0.09 अंकांची घसरण पाहायला मिळत आहे. तसेच आपण 52 आठवड्यामधील या शेअरची कामगिरी पाहिली तर 52 आठवड्यामधील उच्चांकी पातळी 17 रुपये इतकी राहिली व नीचांकी पातळी 6 रुपये इतकी राहिली आहे. जर सध्या वोडाफोन आयडिया या कंपनीचे मार्केट कॅप जर बघितले तर ते साधारणपणे 73 हजार 890 कोटी रुपये इतकी आहे.
वोडाफोन आयडियाच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिलेला परतावा
जर आपण एक वर्षाच्या कालावधीपासून गुंतवणूकदारांना दिलेला परतावा जर बघितला तर तो काहीसा निराशाजनक असल्याचे दिसून येत आहे. एक वर्ष कालावधीमध्ये या शेअर्सने गुंतवणूकदारांना -58.08%, सहा महिन्याच्या गुंतवणुकीवर -24.64%, तीन महिन्याच्या गुंतवणुकीवर -4.21% आणि एक महिन्याच्या गुंतवणुकीवर -8.21% परतावा दिला आहे. एकंदरीत ही आकडेवारी बघितली तर यानुसार गुंतवणूकदारांचे नुकसान झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे.