Business Success Story : कोणत्याही क्षेत्रात कष्ट करण्याची धम्मक असेल तर यश लोटांगण घालत तुमच्या नशीब येत. हे अनेकांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. आज आपण अशाच एका अवलयाचे यशोगाथा जाणून घेणार आहोत जो कधीकाळी 8,000 वर काम करत होता मात्र आज करोडो रुपयांच्या कंपनीचा मालक बनला आहे.
आम्ही ज्या अवलियाबाबत बोलत आहोत ते आहेत Zerodha कंपनीचे संस्थापक नितीन कामत. नितीन कामत यांचे नाव सातत्याने चर्चेत राहते. अलीकडेच त्यांचे नाव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सीईओ मध्ये देखील आले होते. एका मीडिया रिपोर्टनुसार गेल्या आर्थिक वर्षात नितीन कामात आणि त्यांचे भाऊ निखिल कामात यांना 72-72 कोटी रुपयांचा पगार मिळाला होता. यामुळे ते सर्वात जास्त मानधन घेणारे सीईओ बनलेत.
यामुळे या दोघा बंधूंची वारंवार चर्चा होत असते. भारतातील कोणतेच स्टार्टअप संस्थापक एवढ्या मोठ्या प्रमाणात वेतन घेत नाहीत. यामुळे यांची चर्चा होणे हे साहजिकच आहे. विशेष बाब म्हणजे नितीन कामत हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अर्थातच मुकेश अंबानी यांच्या कंपनीची प्रतिस्पर्धा देखील करत आहेत. यामुळे आज आपण कामत यांचा आठ हजाराच्या नोकरीपासून ते करोडो रुपयांच्या मालक बनण्यापर्यंतचा हा जीवन प्रवास थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सुरुवातीला करावा लागला संघर्ष
रिपोर्टनुसार, नितीन कामत हे सुरुवातीच्या काळात कॉल सेंटरमध्ये फक्त 8000 च्या पगारात काम करत होते. विशेष म्हणजे कॉल सेंटरमध्ये नितीन काम करायचे त्यावेळी त्यांचे वय मात्र 17 वर्षांचे होते. घरची परिस्थिती पाहता त्यांना कॉल सेंटरमध्ये काम करणे भाग होते. तथापि त्यांनी परिस्थितीशी झगडत आपल्या करिअरची सुरुवात केली आणि आज ते देशातील सेल्फ मेड बिझनेस मॅन च्या यादीत येतात. त्यांनी 2001 ते 2005 या पाच वर्षांच्या काळात कॉल सेंटरमध्ये काम केले.
विशेष म्हणजे कॉल सेंटर मध्ये काम करत असतानाच त्यांनी शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्याला सुरुवात केली. सुरुवातीला शेअर मार्केटला त्यांनी गांभीर्याने घेतले नाही मात्र शेअर मार्केटमध्ये रुची होती हे वेगळे सांगण्याचे काही कामच नाही. शिवाय शेअर मार्केट मधून चांगला नफा मिळू शकतो हे त्यांना कालांतराने कळून चुकले होते.
मग काय त्यांनी 2005 नंतर स्वतःचं काहीतरी सुरू करायचं या हेतूने स्वतःचा सल्लागार व्यवसाय सुरू केला. पुढे 2010 मध्ये जेव्हा NSE ने फ्री ट्रेडिंग प्लॅटफॉर्म लाँच केले, तेव्हा नितीनला Zerodha सुरू करण्याची आयडिया आली. हीच एक आयडिया नितीन कामात आणि निखिल कामात या दोघा भावांचे आयुष्य बदलून गेली.
2010 मध्ये या दोघांनी बंगलोर मध्ये Zerodha कंपनीची पायाभरणी केली. ही कंपनी मात्र सहा वर्षांच्या काळात भारतीयांच्या मनात घर करून गेली. अवघ्या सहा वर्षांच्या काळात 70,000 ग्राहकांनी या कंपनीवर विश्वास दाखवला. तथापि कंपनीची ही ग्रोथ 2016 नंतर अधिक पाहायला मिळते.
कंपनीने शून्य ब्रोकरेज इक्विटी गुंतवणूक सुरू केल्यानंतर या कंपनीवर लोकांचा विश्वास वाढला. सध्या स्थितीला म्हणजेच 2023 मध्ये या कंपनीची ग्राहक संख्या 64.8 लाख एवढी आहे. तसेच या दोघा बंधूंची एकूण संपत्ती ४५,७५४.५ कोटी एवढी असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
अंबानीसोबत स्पर्धा
विशेष म्हणजे कामात बंधूंनी एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश अंबानीला देखील टक्कर दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Zerodha ने AMC व्यवसायासाठी संपत्ती व्यवस्थापन कंपनी Smallcase सोबत पार्टनरशिप केली आहे. आणि याच व्यवसायात मुकेश अंबानी यांच्याशी त्यांची स्पर्धा आहे. कारण की Jio Financial Services ने जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी BlackRock सोबत पार्टनरशिप करून या व्यवसायात आपली सुरवात केली आहे.