राज्याच्या राजकारणात अल्पावधीमध्ये विशेष स्थान निर्माण करणाऱ्या खासदार नीलेश लंके यांच्या विविध उपक्रमांवर आधारीत तयार करण्यात आलेल्या गाण्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून या गाण्यांना इंस्ट्राग्राम, फेसबुक तसेच युटयुब आदी पब्लिक डोमेनवर तब्बल ५५ मिलियन (५ कोटी ५० लाख) व्हयूज मिळाल्या असून तो विक्रम मानला जातो.
खा. नीलेश लंके यांनी विधानसभा निवडणूकीत यश संपादन करण्यापूर्वीपासून त्यांचा राज्यभरात मोठा चाहता वर्ग असून अनेक गीतकार तसेच संगीतकारांनी त्यांच्या विविध उपक्रमांवर गीते तयार केली असून अनेक नामवंत गायकांनी ही गीते गायली आहेत. खा. लंके हे कोरोना संकटात देवदूत म्हणून संपूर्ण देशासमोर आले. त्यानंतर राज्यातच नव्हे तर देशाच्या विविध भागांमधून त्यांचे फॉलोअर्स वाढले. त्यामुळे लंके यांच्यावरील गाण्यांना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातून पसंती मिळाली आहे.

आता कॉलर टयुनही !
राजकीय नेत्यांमध्ये सर्वाधिक व्हूज असलेली गाणी अशी नोंद पब्लिक डोमेनमध्ये झाली असून काही गाणी विविध मोबाईल कंपन्यांच्या कॉलर टयुनमध्येही समाविष्ट झाली आहे. आता खा. लंके यांचे चाहते या गाण्यांची कॉलर टयुनही लाऊ शकतात.
संपूर्ण टीमसाठी विशेष दिवस
खा. लंके यांच्यावरील गाणी तसेच सोशल मीडियाचे समन्वयक म्हणून काम करणारे मनोज शिंदे यांनी खा. लंके यांच्या गाण्यांना सर्वाधिक व्हूज मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. लोकनेते नीलेश लंके यांच्यावर गाणी तयार करण्याची संधी मला मिळाली याचा मला अभिमान वाटतो, मी भाग्यवान आहे, आजचा दिवस माझ्यासाठी आणि आपल्या संपूर्ण टीमसाठी अत्यंत विशेष आहे. खा. नीलेश लंके यांच्या लोकसेवेचा, त्यांच्या जडणघडीचा आणि जनतेशी असलेल्या घट्ट नात्याचा आरसा या गाण्यांमधून उमटतो आणि त्याचेच फलित म्हणून ही गाणी जनमानसात घर करत असल्याचेही शिंदे यांनी नमुद केले.
वृत्तवाहिन्यांवरही खा. लंके यांना पसंती
विधानसभा निवडणूकीमध्ये तब्बल ६० हजार मतांनी विजयी होउन जायंट किलर म्हणून नावारूपास आलेले खा. नीलेश लंके हे माध्यमप्रतिनिधींच्या गळयातील ताईत बनले आहेत. राजकीय क्षेत्रातील कोणताही विषय असो, खा. नीलेश लंके यांच्या प्रतिक्रियेसाठी माध्यम प्रतिनिधी त्यांचा तात्काळ शोध घेतात. कोरोना संकटानंतर खा. लंके यांची क्रेझ आणखीच वाढली. खा. शरद पवार व पवार कुटूंबियांशी अल्पावधीत जोडले गेलेले व्यक्तिमत्व म्हणून खा. लंके यांच्याकडे पाहिले जात असून त्यांनी घेतलेले अनेक निर्णय हे आजवर बातमीचा विषय ठरले आहेत.