आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मुकुंदनगरमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन !

येत्या काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यभर राजकीय नेत्यांच्या माध्यमातून तयारी सुरू करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे.

Tejas B Shelar
Published:
Ahilyanagar News

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील मुकुंदनगर या उपनगराच्या फकीरवाडा येथील हजरत दम बारा हजारी चिश्ती कब्रस्तानच्या कामाचे नुकतेच भूमिपूजन केले. या भूमिपूजना वेळी आमदार जगताप यांनी उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी बोलताना आमदार जगताप यांनी, फकीरवाडा येथील दम बारा हजारी चिश्ती कब्रस्तानचे काम मार्गी लागावे यासाठी या भागातील नागरिकांनी पाठपुरावा केला आणि त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे सांगितले.

जगताप यांनी आपण नेहमीच मुकुंदनगरच्या विकासासाठी काम केले आहे. एकेक प्रश्न हाती घेऊन त्या प्रश्नाचा निपटारा आपण लावला आहे. या भागात सर्वात मोठी अडचण ही पाण्याची होती. आठ आठ दिवसांनी या भागात पाणी यायचे.

मात्र या भागातील पाण्याची समस्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले असून आता या भागातील नागरिकांना तीन दिवसाआड पाणी उपलब्ध होत असल्याचे आमदार जगताप यांनी म्हटले आहे. मुकुंदनगर येथील रस्त्यांच्या कामासाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.

शहरातील विविध रस्त्यांची कामे यामुळे मार्गी लागली आहेत. ड्रेनेज सिस्टम सुधारण्यासाठी बंद पाईप योजना यशस्वीपणे राबविण्यात आली. यामुळे आता या भागामध्ये नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्य करत आहेत.

सर्वांना बरोबर घेऊन विकासाच्या कामांना प्राधान्यक्रम दिला असल्यामुळेच आपले नगर आता विकसित शहर म्हणून ओळखले जाणार असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला आहे.

खरे तर येत्या काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यभर राजकीय नेत्यांच्या माध्यमातून तयारी सुरू करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने अजून निवडणुकांच्या तारखांची घोषणा केलेली नाही. मात्र लवकरच या तारखांची घोषणा होणार आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली की त्या दिवसापासूनच आचारसंहिता लागू होईल.

दरम्यान विधानसभा निवडणुकांचे आचारसंहिता लागू होणे आधीच आमदार जगताप यांच्या माध्यमातून मुकुंद नगर येथील विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले असल्याने येथील नागरिकांना नक्की यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल अशी आशा येथील नागरिकांनी देखील व्यक्त केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe