Ahilyanagar Politics : विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा नारळ कधीच फुटला आहे. महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरत आता प्रचाराला सुरुवात केली आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात देखील महायुती आणि महा विकास आघाडीच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून प्रचारात नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संग्राम दादा जगताप यांनी आघाडी घेतल्याचे दिसते.
20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार संग्राम जगताप व संपूर्ण महायुतीमधील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तयारी करत आहेत. आ. जगताप यांनी नुकताच जाधव मळा सरोदे कॉलनी हडको दातरंगे मळा परिसरातील नागरिकांशी विकास यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला.

यावेळी जगताप यांनी, नागरिकांच्या सहकार्यातून विकास कामांची मुहूर्तमेढ उभी केली असून सतत जनतेच्या संपर्कात राहून प्रश्न सोडविण्याचे काम केले असल्यामुळे ऋणानुबंध निर्माण झालेत.
दरम्यान आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतरुपी आशीर्वाद घेण्यासाठी थेट जनतेच्या दारात जात असताना नागरिक मोठ्या उत्साहात स्वागत करताना पाहावयास मिळतय.
या निमित्ताने मतदारसंघातील जनतेचे माझ्यावर असलेले प्रेम पाहून मन भारावून गेलय, अशी भावना आमदार जगताप यांनी यावेळी बोलून दाखवली.
पुढे बोलताना जगताप यांनी शहरात गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामातून नागरिकांचा विश्वास संपादन केला असल्यामुळे नागरिक, महिला ठिकठिकाणी मोठ्या संख्येने घराबाहेर येत औक्षण करत पेढे खाऊ घालत आहे, या माध्यमातून मी केलेल्या कामाची पावतीच मला मिळत आहे असे प्रतिपादन केले असून त्यांनी त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
जगताप यांच्या निवडणुकीच्या प्रचाराला मतदार संघातील जनता उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवत असून 23 तारखेला नगर शहर विधानसभा मतदारसंघातील जनता नेमका कोणाच्या बाजूने कौल देणार, पुन्हा एकदा विद्यमान आमदार जगताप यांना संधी मिळणार का हे स्पष्ट होणार आहे.