Ahmednagar Breaking : माजी आमदारास अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक ! अटकेनंतर माजी आमदाराची प्रकृती खालावली आणि……

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर काल अर्थातच 7 ऑक्टोबर 2024 ला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. राहुरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल झाल्यानंतर ताबडतोब मुरकुटे यांना पोलिसांनी अटक केली.

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक अतिशय महत्त्वाची आणि खळबळ जनक बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदाराला अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. यामुळे श्रीरामपूर तालुक्यासहित संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर काल अर्थातच 7 ऑक्टोबर 2024 ला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. राहुरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल झाल्यानंतर ताबडतोब मुरकुटे यांना पोलिसांनी अटक केली.

राहुरी तालुक्यातील एका महिलेने अत्याचाराचा हा गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने काल सायंकाळी राहुरी पोलीस ठाण्यात माजी आमदार मुरकुटे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती.

पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास मुरकुटे यांना अटक झाली. खरंतर मुरकुटे हे कामानिमित्ताने शहराबाहेर होते. ते काल उशिरा त्यांच्या निवासस्थानी आलेत.

मुरकुटे हे काल मुंबईत होते. मुंबईतून श्रीरामपूर येथे दाखल झाल्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास राहुरी पोलीस त्यांच्या निवासस्थानी गेलेत. त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून मुरकुटे यांना अटक केली.

त्यामुळे तालुक्यातील राजकारण तापले आहे. दरम्यान, मुरकुटे यांना अटक झाल्यानंतर रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. रक्तदाबाचा त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर मुरकुटे यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणात आता पुढील तपास सुरू केला आहे. पण, ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधीच मुरकुटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याने माजी आमदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

यामुळे आता या प्रकरणात चौकशीनंतर काय सत्य समोर येते हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे. यामुळे आता या प्रकरणाकडे श्रीरामपूर तालुक्यासहित संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe