Ahmednagar Breaking : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर मध्ये राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली होती. नगर शहर विधानसभा मतदारसंघातही इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे.
विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांनीही आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आमदार संग्राम भैय्या जगताप सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील मुकुंदनगर येथे लाडकी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
7 ऑक्टोबरला हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी आमदार संग्राम भैय्या जगताप सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जय्यत तयारी करण्यात आली आहे. खरे तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून संग्राम भैय्यांनी एका प्रकारे निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
यातून मत पेरणीचा प्रयत्न संग्राम भैया यांच्या माध्यमातून केला जात आहे. मात्र या कार्यक्रमाला आता मुकुंद नगर येथून विरोध होऊ लागला आहे. मुकुंदनगर येथील मुस्लिम महिलांनी या कार्यक्रमाचा खुला विरोध केला आहे.
याविरोधात मुकुंदनगर येथील मुस्लिम महिला यांनी आवाज बुलंद केला असून हा कार्यक्रम मुस्लिम विरोधी असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे येथील मुस्लिम महिलांनी या कार्यक्रमाचा विरोध केला आहे तसेच पुढेही असे कार्यक्रम होऊ नयेत असे या महिलांचे म्हणणे आहे.
यामुळे आता आमदार संग्राम भैय्या जगताप या कार्यक्रमासंदर्भात काय निर्णय घेणार? हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की संग्राम भैया जगताप सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या लाडकी होम मिनिस्टर या कार्यक्रमात जी महिला पहिली येईल तिला सुझुकी एक्सेस स्कूटर आणि ड्रेस मटेरियल दिले जाणार आहे.
दुसऱ्या येणाऱ्या महिलेला फ्रीज अन ड्रेस मटेरियल आणि तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या महिलेला टीव्ही अन ड्रेस मटेरियल दिला जाणार आहे. याशिवाय सात उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाणार आहेत. उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून ड्रेस मटेरियल आणि स्मार्ट वॉच दिले जाणार आहे.
त्यामुळे सध्या या कार्यक्रमाची मुकुंदनगर मध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. एकीकडे या कार्यक्रमाच्या बक्षीसांची चर्चा आहेच तर दुसरीकडे या कार्यक्रमाला आता विरोध होऊ लागल्याने हा कार्यक्रम होणार का हा मोठा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
कार्यक्रम झाला तर मुस्लिम महिलांच्या विरोधाला सामोरे जावे लागणार आहे आणि यामुळे निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे 7 ऑक्टोबरला संग्राम भैय्या जगताप यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम रद्द होणार की नियोजनाप्रमाणे कार्यक्रम होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.