‘ते’ तर नगर शहरातील गद्दार आहेत, शरद पवार साहेबांनी संधी दिल्यानंतरही ते सोडून गेलेत; पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांचा रोख कुणाकडे ?

यावेळी माजी महापौर आणि शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कळमकर यांनी शरद पवार यांनी नगर शहरातल्या एका कुटुंबाला चार वेळा आमदारकी दिली. मात्र त्यांनी शहरात कोणतीच विकास कामे केली नाहीत. राज्याप्रमाणे गद्दारीची उदाहरणे नगर शहरात सुद्धा वेळोवेळी दिसून आली आहेत. त्यांनी भाजप बरोबर जाऊन महापालिकेवर झेंडा फडकवला.

Tejas B Shelar
Updated:
Ahmednagar News

Ahmednagar News : भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे. इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. अजून महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवारांची घोषणा केलेली नाही मात्र इच्छुकांच्या माध्यमातून रंगीत तालीम सुरू झाली आहे.

नगर शहर विधानसभा मतदारसंघात देखील असेच चित्र आहे. या विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाचा उमेदवार उभा केला जाईल अशी शक्यता आहे. असे झाल्यास यावेळी अजित पवार पुन्हा एकदा विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांना संधी देऊ शकतात.

यामुळे जगताप यांच्याकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी कडून माजी महापौर संदीप कोतकर यांचे नाव चर्चेत आले आहे. मात्र अजून यासंदर्भात महाविकास आघाडी कडून कोणतेच संकेत मिळालेले नाहीत.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष शरद कळमकर यांनी कोतकर यांचे नाव संभाव्य उमेदवारीसाठी चर्चेतच नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान राज्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रा काढली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली ही यात्रा काल अकोले येथे होती. आज ही यात्रा नगर शहरात धडकली.

यावेळी माजी महापौर आणि शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कळमकर यांनी शरद पवार यांनी नगर शहरातल्या एका कुटुंबाला चार वेळा आमदारकी दिली. मात्र त्यांनी शहरात कोणतीच विकास कामे केली नाहीत. राज्याप्रमाणे गद्दारीची उदाहरणे नगर शहरात सुद्धा वेळोवेळी दिसून आली आहेत. त्यांनी भाजप बरोबर जाऊन महापालिकेवर झेंडा फडकवला.

तसेच, त्यांनी मागील नऊ वर्षांत विकासकामांसाठी निधी का आणला नाही ? २०१४पासून शहराच्या विकास कामांसाठी निधी का आणता आला नाही, असा सवाल करत कळमकर यांनी जोरदार टीका केली. पक्षफुटी नंतर राष्ट्रवादीतील सर्व नगरसेवक सोडून गेलेत मात्र दादा कळमकर व त्यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते येथेच राहिलेत. आमचे कुटुंब नेहमीच पवार साहेबांच्या सानिध्यात राहिले आहे.

हो, मी पण शिवसेनेत गेलो होतो मात्र त्याला काय कारणे होती हे जनतेला माहिती आहे. पुढे बोलताना कळमकर यांनी माझ्या कुटुंबाने काही गद्दारी केली असेल तर मला तिकीट देऊ नका असे म्हणतं माझ्या कुटुंबाने कधीच गद्दारी केली नाही असे स्पष्ट केले. पुढे बोलताना कळमकर यांनी, ते शहरभर जाहिरातींचे फलक लावत आहेत.

जी कंपनी सर्वांत जास्त जाहिरात करते. त्यांंची विश्वासहर्ता कमी झालेली असते असं म्हणत जोरदार टोलेबाजी केली. ते म्हटलेत की, महाविकास आघाडी नगर शहरात जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे आपण सर्व एकत्र उभे राहणार आहोत. नगर शहरातील नागरिक त्रस्त आहेत. शहरातील महिला, नागरिक भयभीत आहेत.

शहरातील गुन्हेगार कोणाच्या वाहनांत फिरतात हे जनतेला माहिती आहे, असं म्हणतं कोणाचेच नाव न घेता टिका केली आहे. यामुळे माजी महापौर कळमकर यांच्या या भाषणाची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यांनी आपल्या भाषणातून आपण उमेदवारीसाठी इच्छुक आहोत असेही दाखवून दिले आहे. यामुळे यावेळी महाविकास आघाडी कडून कोणाला तिकीट मिळणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe