नगर शहर विधानसभा मतदारसंघ : यंदाची निवडणुक काटेदार होणार ! MIM कडून ‘हा’ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. MIM सुद्धा आगामी निवडणुकीसाठी पूर्णपणे तयारीत आहे. पक्षाने उमेदवारांची शोधाशोध सुरू केली आहे. उमेदवारांची चाचपणी जोरात सुरू असून इच्छुक उमेदवाराकडून अर्ज भरून घेतले जात आहेत.

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभेनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू होणार आहे. राज्यातील दोन प्रमुख पक्षांमध्ये म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनता कोणाला कौल देणार हा मोठा यक्षप्रश्न आहे.

खरेतर, या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्षात जेव्हा निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा समोर येऊ शकणार आहे. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले आहे. त्यांच्या तुलनेत महायुतीला अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही.

मात्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. MIM सुद्धा आगामी निवडणुकीसाठी पूर्णपणे तयारीत आहे. पक्षाने उमेदवारांची शोधाशोध सुरू केली आहे. उमेदवारांची चाचपणी जोरात सुरू असून इच्छुक उमेदवाराकडून अर्ज भरून घेतले जात आहेत.

नगर शहर विधानसभा मतदारसंघासाठीही चाचपणी केली जात आहे. दरम्यान नगर शहर विधानसभा मतदारसंघात एमआयएम कडून यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात असे दिसत आहे. या अनुषंगाने त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे.

त्यांनी नुकतेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली असून आगामी निवडणुकी संदर्भात बंद दाराआड चर्चा सुद्धा केली आहे. या भेटीनंतर परवेज यांनी नगर शहरातील घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या औरंगाबाद इथल्या कार्यालयात विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व इच्छुकांनी गर्दी केली होती. यावेळी जलील यांनी जिल्हाध्यक्ष अशरफी यांच्याकडून जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला.

यावेळी परवेज अशरफी म्हणालेत की, नगर शहर विधानसभा मतदारसंघात वर्षानुवर्ष जी घराणेशाही चालली आहे, त्याला कुठे तरी थांबवणे गरजेचे आहे. नगर शहराला, असा आमदार पाहिजे जो प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन चालेल. जाती-जातीत तेढ निर्माण करून दंगल घडवणारा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजणारा लोकप्रतिनिधी नको.

यामुळेच पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे. यामुळे परवेज यांना MIM कडून उमेदवारी मिळू शकते असे बोलले जात आहे. यामुळे नगर शहर विधानसभा मतदारसंघात यंदा चांगलीचं चुरस वाढणार आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला धोकेबाज आणि महायुतीला मुस्लिमांची गरज नसल्याचे म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe