साहेबांपाठोपाठ दादाही अहमदनगरमध्ये ! काय गणिते फिरवणार ? पहा..

नुकताच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा अहमदनगर दौरा झाला. यावेळी त्यांनी अकोले, संगमनेर आदी तालुक्यात चांगलीच मोर्चे बांधणी केली. अहमदनगर जिल्ह्यातही पॉझिटिव्ह वातावरण करण्यात त्यांना यश आले. दरम्यान आता त्यांच्या दौऱ्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अहमदनगर दौरा आहे. ते आज ( सोमवार) नगर शहर, श्रीगोंदे या तालुक्यांचा दौरा करतील.

Ahmednagarlive24 office
Published:
pawar

Ahmednagar Politics : नुकताच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा अहमदनगर दौरा झाला. यावेळी त्यांनी अकोले, संगमनेर आदी तालुक्यात चांगलीच मोर्चे बांधणी केली. अहमदनगर जिल्ह्यातही पॉझिटिव्ह वातावरण करण्यात त्यांना यश आले.

दरम्यान आता त्यांच्या दौऱ्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अहमदनगर दौरा आहे. ते आज ( सोमवार) नगर शहर, श्रीगोंदे या तालुक्यांचा दौरा करतील.

आधी नगर गाजवतील..
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी सकाळी सावेडी उपनगरातील बंधन लॉन येथे महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे तेथे लाडकी बहीण योजनेंसदर्भात महिला भगिनींशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा संपत बारस्कर यांनी दिली.

या मेळाव्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंढे, महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार संग्राम जगताप आदी उपस्थित राहणार आहेत.

त्यामुळे आता अजित पवार नगरमध्ये आपली पाळेमुळे भक्कम करतील. विधानसभेच्या अनुशंघाने नगर मतदारसंघ हा राष्ट्रवादीलाच सुटेल. त्यामुळे येथे अजित पवार यांचा मेळावा व इतर भेटीगाठी महत्वाच्या ठरतील.

श्रीगोंदेमध्येही ‘दादा’ फिल्डिंग लावतील
उपमुख्यमंत्री अजित पवार हे श्रीगोंदेमध्येही जाणार आहेत. येथेही दादा काय बोलतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांचा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने माहोल तयार करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सहा महिन्यांत दुसऱ्यांदा श्रीगोंद्याच्या दौऱ्यावर येत आहेत असे बोलले जात आहे.

पण ही जागा तर भाजपकडे आहे त्यामुळे आता सोमवारी (दि.२१) श्रीगोंदा फॅक्टरी येथे होत असलेल्या मेळाव्यात अजित पवार हे श्रीगोंद्याच्या जागेबाबत काय बोलणार? याकडे लक्ष लागले आहे. श्रीगोंदा-विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून आमदार बबनराव पाचपुते (भाजप),

नागवडे (राष्ट्रवादी), महाविकास आघाडीकडून राहुल जगताप (शरद पवार गट), साजन पाचपुते (उद्धव सेना), घनश्याम शेलार (काँग्रेस) यांची नावे चर्चेत आहेत. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार हेही चाचपणी करीत आहेत.

श्रीगोंद्याच्या राजकीय आखाड्यात आमदार म्हणून बबनराव पाचपुते यांना सातवेळा, स्व. शिवाजीराव नागवडे यांना दोनवेळा, कुकडीचे अध्यक्ष राहुल जगताप यांना एक वेळ आमदारकीची संधी मिळाली. २०२४ च्या विधानसभा रणसंग्रामात उतरण्यासाठी तीनही घराणी पुन्हा सज्ज झाली आहेत.

तिकीट कुणाला आणि बंडखोरी कुणाची? हाच प्रश्न ऐरणीवर आहे. श्रीगोंद्याची जागा ही भाजपकडे आहे. श्रीगोंदा-अकोलेची जागा बदली करण्याचा प्रस्ताव मांडून श्रीगोंद्याची जागा ही अनुराधा नागवडेंसाठी मिळेल,

अशी गणिते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मांडत आहेत. अशा परिस्थितीत अजित पवार हे याबाबत श्रीगोंद्यात काय राजकीय डावपेच टाकणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe