नगरमध्ये भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, आमदार मोनिका राजळे समर्थक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात काय घडलं ?

यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी पदाधिकाऱ्यांना मतदानाची माहिती दिलीच नाही असा आरोप शेवगाव-पाथर्डी भाजपाचे तुषार वैद्य, अरुण मुंडे आणि गोकुळ दौंड यांनी केला. राजळे यांनी चुकीचे पदाधिकारी मतदानाला उभे केले आहेत असा आरोप झाला आणि मतदान प्रक्रियेला विरोध करण्यात आला. यामुळे राजळे समर्थक देखील यावेळी कमालीचे आक्रमक झालेत.

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु होईल. त्या आधी महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. महायुती मधील भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून उमेदवारांच्या निश्चितीसाठी पक्षांतर्गत स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मतदान प्रक्रिया राबवली जात आहे.

मात्र ही पक्षांतर्गत मतदानाची प्रक्रिया काही ठिकाणी भाजपाच्या अंगलट येत आहे. यानिमित्ताने भाजपाचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येत आहे. खरे तर ही प्रक्रिया नगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी यशस्वीरित्या पार पडली.

मात्र शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार निवडीसाठीच्या मतदानाच्या प्रक्रिये वेळी विद्यमान आमदार मोनिका रांजळे समर्थक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.

रांजळे समर्थक आणि पदाधिकारी यांच्यात झालेल्या राड्यानंतर पक्ष निरीक्षकांनी ही मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचा हा स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील वाद प्रदेश भाजपामधील पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे.

यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी पदाधिकाऱ्यांना मतदानाची माहिती दिलीच नाही असा आरोप शेवगाव-पाथर्डी भाजपाचे तुषार वैद्य, अरुण मुंडे आणि गोकुळ दौंड यांनी केला.

राजळे यांनी चुकीचे पदाधिकारी मतदानाला उभे केले आहेत असा आरोप झाला आणि मतदान प्रक्रियेला विरोध करण्यात आला. यामुळे राजळे समर्थक देखील यावेळी कमालीचे आक्रमक झालेत.

आमदारांच्या समर्थकांनी मतदान प्रक्रियेची माहिती प्रदेश पातळीवरून देण्यात आली होती यात आमदारांचा संबंध नाही असे म्हणत पदाधिकाऱ्यांचा आरोप साफ खोटा असल्याचे म्हटले.

पक्ष निरीक्षकांसमोर राजळे समर्थक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राडा झाल्यामुळे उमेदवार निवडीसाठी घेण्यात आलेले पक्षांतर्गत मतदान स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe