सासऱ्याचं वाटोळं अन इतरांच कल्याण करणारी सून या जन्मी भेटली पुढच्या जन्मी नको रे बाबा ; माजी आ. भानुदास मुरकुटेंनी घेतला सुनबाईचा समाचार

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे रणकंदन सुरू झाले आहे. खरे तर, निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार आहेत मात्र निवडणुकांच्या आधीच इच्छुक उमेदवारांनी रंगीत तालीम सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षातील नेते आता कमालीचे सक्रिय झाले आहेत.

या दोन्ही गटातील नेत्यांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या देखील सुरू झाल्या आहेत. दरम्यान, काल श्रीरामपूरमध्ये माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि त्यांच्या सूनबाई यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता.

सासर्‍याचं वाटोळ करून इतरांच कल्याण करणारी सुनबाई कुणालाच नको, या जन्मी भेटलात पुढच्या जन्मी नको, असं म्हणतं माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी सुनबाई डॉक्टर वंदनाताई मुरकुटे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.

यामुळे सध्या माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या या वक्तव्याची नगरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 27 सप्टेंबरला अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत पंचायत समितीच्या माजी सभापती डॉक्टर वंदनाताई मुरकुटे यांनी साखर कारखाना प्रशासनाबाबत काही प्रश्न उपस्थित केलेत आणि आक्षेप नोंदवलेत.

याच्या उत्तरात माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी सुनबाई वंदनाताई मुरकुटे यांचा जोरदार समाचार घेतला. माजी आमदार मुरकुटे यांनी, अशी डॉक्टर सूनबाई कुणाच्याच घरात नको, सासर्‍याचं वाटोळ करून इतरांच कल्याण करू पाहणारी सुनबाई नको.

मी आजपर्यंत त्यांच्यासाठी सर्व काही केलं, जे नाही ते दिलं, अन् ते आम्हाला सांगतात चुकीचं काय आणि बरोबर काय? त्यांना हे सर्व वैभव उभ करून दिलंय. मी काहीच केलं नसतं तर इतरांसारखी कामे करावी लागली असती, असं म्हणत वंदनाताई यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

पुढे बोलताना माजी आमदार मुरकुटे यांनी या आमच्या सूनबाई माझ्याविषयी अशा वागतात, तर लोकांविषयी त्यांना काय आपुलकी राहणार? केवळ सत्तेसाठी त्या हापापलेल्या आहेत, असे म्हणतं आपल्याच सुनबाईचा खरपूस समाचार घेतला. यामुळे सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात सासरा आणि सून यांच्यात रंगलेल्या या कलगीतुऱ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.