Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात अनेक दिग्गज राजकारणी आहेत. श्रीगोंदे तालुक्यात मात्र दिग्गजांची संख्या लक्षणीय आहे. आगामी विधानसभेला ही दिग्गज मंडळी एकमेकांची डोकेदुखी ठरतील हे मात्र नक्की. या दिग्गजांची आतापासूनच एकमेकांवर फटकेबाजी सुरु झाली आहे.
याची प्रचिती आली आहे सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत. नागवडे कारखान्याची ५९वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली.
या सभेत काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार व कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यातच राजकीय जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाली. या वार्षिक सभेत काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी नागवडेंच्या कारभारावर टीका केली.
कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आपल्या खास शैलीत त्यांना उत्तर दिल. परंतु या सभेकडे आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप यांनी सभेकडे पाठ फिरवली. यानिमित्त नागवडे विरोधकांनी घनश्याम शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवल्याचे दिसून आले.
काय म्हणाले शेलार?
ऑडिट वर्ग अ मिळाला असला तरी कारखान्याची परिस्थिती विचार करण्यासारखी आहे. ज्यांनी कारखान्यास ताकद दिली, असे शरद पवार, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील तसेच ज्यांना तुम्ही आमदार केले असे बबनराव पाचपुते यांचे फोटो का छापले नाहीत,
असा सवाल उपस्थित केला. कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर यांनी कारखान्याचे ऊसतोडीसाठी नियोजन नसल्याने सभासदांना, शेतकऱ्यांना ऊस दुसरीकडे देण्याशिवाय पर्याय नसल्याने कार्यक्षेत्रातील ८० टक्के ऊस बाहेरच्या कारखान्याला गेला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी डिंबे माणिकडोह बोगदा करा म्हणून ठराव करा, अशी मागणी केली.
काय म्हणाले नागवडे?
नागवडे साखर कारखान्याने नुसत्या घोषणा केल्या नाहीत तर सभासदांच्या हिताची कृती केली आहे. तसेच शेलार यांना उद्देशून ते म्हणाले तुम्ही सारखे पक्ष बदलतात
मग जुन्या पक्षातील नेत्यांचे कार्यालयात फोटो का ठेवले नाहीत. आम्ही ज्या पक्षात आहोत त्याच पक्षातील नेत्यांचे फोटो छापले याचा अर्थ विरोधी पक्षातील नेत्यांविषयी अनादर आहे, असे विष पेरू नका.