वृत्तवाहिनीवरील ईव्हीएम तपासणी व पडताळणीबाबतचे वृत्त चुकीचे जिल्हा निवडणूक प्रशासनाचे स्पष्टीकरण

सुजय विखे यांनी लोकसभेच्या निकालानंतर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आदींच्या तपासणीसाठी अर्ज केला होता. आता या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी खा. सुजय विखे पाटील यांची निवडणूक आयोगाकडे केलेली याचिका निकाली काढण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 office
Updated:
lanke

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ३७-अहमदनगर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. सुजय विखेपाटील यांनी लोकसभा मतदारसंघामध्ये ‘चेकींग अँड व्हेरिफीकेशन ऑफ बर्न्ट मेमरी/मायक्रोकन्ट्रोलर ऑफ ईव्हीएम’ बाबत केलेला अर्ज भारत निवडणूक आयोगाने निकाली काढल्याचे एका मराठी वृत्तवाहिनीवर प्रसारित वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नसून डॉ. सुजय राधाकृष्ण विखेपाटील यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ३७-अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधील निवडणूक प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात कायदेशिर प्रक्रिया सध्या सुरू असून सदर याचिका अद्याप प्रलंबित आहे.

‘चेकींग अँड व्हेरिफीकेशन ऑफ बर्न्ट मेमरी/मायक्रोकन्ट्रोलर ऑफ ईव्हीएम’ बाबत मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ जे निर्देश देतील त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe